पुणे : वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावर घडली. याप्रकरणी एकाला खडकी पोलिसांनी अटक केली. संदीप सुनील कवाळे (वय २७, रा. डाॅ आंबेडकर चौक, औंध रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अभिजीत प्रदीप मोरे (वय ३८, रा. चव्हाण वस्ती, बोपोडी) याला अटक करण्यात आली. याबाबत कवाळे याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवाळे आणि मोरे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कवाळे हा बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्याने निघाला होता. त्यावेळी आरोपी मोरेने त्याला साई मंदिरासमोर अडवले. त्याने त्याला शिवीगाळ केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या कवाळेला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. पसार झालेल्या मोरेला पोलिसांनी अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.

हेही वाचा – मालमत्तेसबंधीत टपाल विभागाला ऑनलाईन नोटीस… काय होणार परिणाम ?

हेही वाचा – पुणे : महागड्या ‘स्कॉच’मध्ये भेसळ, उत्पादन शुल्क विभागाकडून भेसळयुक्त मद्याच्या बाटल्या जप्त

गंभीर गुन्हे वाढले

शहरात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण अशा गंभीर गुन्ह्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात शहरात पाच खुनाच्या घटना घडल्या. किरकोळ वादातून हल्ले करण्याच्या घटना वाढल्या असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Story img Loader