पुणे : राज्याच्या अनेक भागांत डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झाला असून आतापर्यंत एक लाख ८७ हजार रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी शनिवारी दिली.सर्वाधिक रुग्णंसख्या बुलढाण्यात असून, त्यापाठोपाठ जळगाव, अमरावती आणि पुण्यात रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभाग अधिक रुग्णंसख्येच्या भागात सर्वेक्षण करून उपाययोजना करीत आहे. डोळे येण्याचे सर्वाधिक ३० हजार ५९२ रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळले आहेत. त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यात १२ हजार १३९, अमरावतीत १० हजार ७१०, पुण्यात १० हजार ५३१ आणि अकोल्यात १० हजार १३२ रुग्णांची नोंद झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत तीन हजार ५५१ रुग्ण सापडले असून, पुणे महापालिका हद्दीत एक हजार १९५ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील रुग्णसंख्या एक हजार ३१७ आहे.

एंटेरोविषाणूच्या संसर्गामुळे..

गेल्या महिन्यात पुणे जिल्ह्यात आळंदी परिसरात डोळय़ाच्या साथीचे चार हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेने शाळांमध्ये तपासणी मोहीम हाती घेतली होती. आळंदी परिसरातून राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने (एनआयव्ही) रुग्णांचे नमुने गोळा केले होते. त्याचा अहवाल आरोग्य विभागाला सादर करण्यात आला होता. त्यात एंटेरोविषाणूमुळे ही साथ पसरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
all 1676 polling stations in Nashik and Malegaon have CCTV and live webcast
नाशिक, मालेगावातील १६७६ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ

अशी घ्या काळजी..

वैयक्तिक स्वच्छता ठेवणे
वारंवार हात धुणे
डोळय़ांना स्पर्श करणे टाळणे
रुग्णांचे घरातच विलगीकरण
परिसर स्वच्छता ठेवून माशा, चिलटांचे प्रमाण कमी करणे

लक्षणे काय?

डोळे लाल होणे
डोळय़ांतून वारंवार पाणी येणे
डोळय़ांना सूज येणे

साथग्रस्त भागात घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे. उपचारासाठी औषधेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. – डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्यसेवा