जर्मन बेकरी खटला अंतिम टप्प्यात आला असून दोन्ही पक्षांचा युक्तिवाद संपला आहे. या खटल्याचा निकाल लवकरच अपेक्षित असून खटल्याची पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी होणार आहे.
लष्कर परिसरातील जर्मन बेकरी येथे १३ फेब्रुवारी २०१० रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या खटल्यातील सर्व साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरोपी हिमायत बेगचा जबाबही नोंदविण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. राजा ठाकरे काम पाहत आहेत. तर, बचाव पक्षातर्फे अॅड. ए. रेहमान आणि अॅड. कायनाथ शेख काम पाहत आहेत. लवकरच या खटल्याचा निकाल अपेक्षित असून खटल्याची पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी होणार आहे.