पिंपरी : वीज, पाणी या मूलभूत सुविधांसह सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल, आयटी पार्क, शैक्षणिक संस्था यामुळे पिंपरी-चिंचवड शहर नागरिकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. नागरिकांची राहण्यासाठी शहराला पसंती मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून शहरातील मालमत्तांची संख्या गेल्या सात वर्षांत साडेचार लाखांवरून सहा लाखांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात शहरात २६ हजार ६२८ मालमत्तांची भर पडली आहे.

पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या सुमारे ३० लाखांवर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल शहराची ओळख बनली आहे. शहरात पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या आहेत. शहराच्या विविध भागात झालेले उद्याने, क्रीडांगणे, जलतरण तलाव यासह महापालिकेने उभारलेल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे हा परिसर नागरिकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. त्यामुळे दरवर्षाला शेकडो मालमत्तांची भर पडत आहे.

214 flats sold at Thane property exhibition
ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शनात २१४ सदनिकांची विक्री
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
1511 unauthorized constructions on 276 acres in Kudalwadi demolished
कुदळवाडीतील २७६ एकरवरील १ हजार ५११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
More than 70 flats grabbed by 37 housing societies on MHADA plots
म्हाडा भूखंडावरील ३७ गृहनिर्माण संस्थांकडून ७० हून अधिक सदनिका हडप!
MHADA to release 629 houses in Mumbai Mandal on February 16 mumbai news
पत्राचाळीतील घरांचा ताबा; म्हाडाच्या मुंबई मंडळातील ६२९ घरांसाठी १६ फेब्रुवारीला सोडत
10 thousand vacant posts of Anganwadi workers and helpers will be filled
अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची १० हजार रिक्त पदे भरली जाणार
MHADA housing lottery draw by Minister Eknath Shinde hands
‘म्हाडा’ कोकण मंडळ सोडत : २२६४ पैकी केवळ १२३९ घरांचीच विक्री
House prices in Mumbai Thane increased by 18 percent last year
मुंबई ठाण्यातील घरांच्या किंमतीत गेल्यावर्षी तब्बल १८ टक्के वाढ

हेही वाचा >>> पुणे: संगमवाडी नदीपात्रात महादेवाची पिंड, इंग्रजकालीन पिस्तूल

शहरात २०१७ मध्ये चार लाख ५० हजार ७६१ मालमत्ता होत्या. सध्या पाच लाख ९७ हजार ७८५ मालमत्ता आहेत. यावरून शहराच्या वाढीचा आलेख लक्षात येत आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरालगतच हिंजवडी आयटी पार्क, तळवडे आयटी पार्क, चाकण, रांजणगाव एमआयडीसी हा भाग येतो. या भागात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. संपूर्ण देशभरातून या भागात कामगार वर्ग रोजगारानिमित्त वास्तव्यास आहे. मात्र, या भागात अंतर्गत रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधा अद्यापही अपुऱ्या आहेत. त्यामुळे येथील कामगार वर्ग पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास प्राधान्य देतो. याचाच परिणाम आयटी पार्क आणि एमआयडीसीलगतच्या पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. गुंठा, दोन गुंठा जागा घेऊन शहरात बांधकाम करण्याचे प्रमाण मोठे आहे.

समाविष्ट भागात मालमत्तांचे प्रमाण जास्त

महापालिकेत २५ वर्षांपूर्वी समाविष्ट झालेला मामुर्डी, रावेत, किवळे, पुनावळे, मोशी, चऱ्होली, दिघी, वडमुखवाडी, चोविसावाडी, डुडुळगाव, चिखली या ग्रामीण भागाचा गेल्या काही वर्षांत सर्वांगीण विकास होताना दिसून येत आहे. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गृह संकुले उभी राहत आहेत. याशिवाय अर्धा, एक गुंठा जागेत घरे बांधणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. शहरात २०१७ मध्ये निवासी, औद्योगिक, मोकळी जागा अशा साडेचार लाख मिळकती होत्या. सात वर्षांत औद्योगिक मिळकतीसह निवासी मिळकतींच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली असून दीड लाख मिळकती वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातही दिवसेंदिवस वाढ होत आहे.

महापालिका पाणी, पायाभूत सुविधा, पर्यावरण, दर्जेदार सोयी-सुविधा देण्याचा सतत प्रयत्न करत असते. सर्वांत जास्त राहण्यायोग्य पिंपरी-चिंचवड शहर करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. शहरात क्रीडांगणे, मैदाने, प्रशस्ते रस्ते, मनोरंजनाची साधने आहेत. त्यामुळे नागरिक पिंपरी-चिंचवडमध्ये राहण्यास पसंती देतात. जितेंद्र वाघ-अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

Story img Loader