शिरूर : स्वारगेट बसस्थानका मधील शिवशाही मध्ये युवतीवर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपी दत्तात्रेय गाडे यांच्या गुनाट गावात आज पोलीसांच्या १० पथकातील १०० हून अधिक पोलिसांनी, श्वान पथकासह तीन ड्रोनच्या सहाय्याने स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेत गाडे याला शोधण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम राबविली. मोठ्या संख्येने पोलिसाच्या फौजफाटा गुनाट परिसरात आज सकाळ पासून गाडे याचा शोध घेत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी व स्थानिकांनी गुनाट निर्वी रस्त्यांवरील उसाच्या शेतासह अन्य भागात आरोपी गाडे यांचा शोध घेतला. तीन ड्रोन ही या परिसरात पोलीसाच्या शोध मोहिमेत होते. सहपोलीस आयुक्त रजतकुमार शर्मा यांच्या सह वरिष्ठ पोलीस अधिकारी निखील पिंगळे, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आदी घटनास्थळी ठाण मांडून होते. सायंकाळी ही शोध मोहीम थांबविण्यात आली. आरोपी दत्तात्रेय गाडे यांची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य असून आई वडील शेतात काम करतात एक भाऊ आहे . त्याच्या वर चोरीच्या गुन्हा सह अन्य गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहे. गाडे यांचे राजकीय नेत्या सोबत असणा-या फोटो मुळे शिरूरचे राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी हा खटला फास्टट्रग कोर्टात चालवावा व आरोपी गाडे यास फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली .तर माजी आमदार अशोक पवार यांनी ही या आरोपीस तातडीने ताब्यात घ्यावे व फाशीची शिक्षा करावी अशी मागणी करून गाडे उज्जैन यात्रेला कोण्याला मदत करत होता याची ही चौकशी करावी अशी मागणी केली.