आईने मोबाईलवर गेम खेळू दिला नाही म्हणून १३ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली.  दर्शन मनीष भुतडा (१३) असे मृत मुलाचे नाव आहे. पुण्यातील धनकवडीतील गणेशनगर भागात ३१ डिसेंबर रोजी ही धक्कादायक घटन घडली. दर्शनला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. सोमवारी दुपारच्या सुमारास दर्शन मोबाईलवर गेम खेळत बसला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दर्शनच्या हातात मोबाईल पाहून आई संतापली. अभ्यास कर, मोबाईल वर खेळू नको अशा शब्दात आईने त्याला खडसावले. आईचे बोलणे सहन न झाल्याने दर्शनने मोबाईल ठेवला व आपल्या रुममध्ये निघून गेला. बराच वेळ झाला तरी दर्शन बाहेर येत नसल्याने आईने त्याला आवाज दिला.

अखेर त्याच्या आईने दरवाजा उघडल्यावर दर्शनने गळफास घेतल्याचे समोर आले. त्यांनी दर्शनला नजीकच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर दर्शनला मृत घोषित केले. या प्रकरणी पुढील तपास चालू आहे.