पुण्याच्या बावधानमध्ये मित्राने मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अनिलकुमार राई यासह तिघा जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. प्रेम बहादुर थापा असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी अनिलकुमार राई आणि प्रेम बहादुर थापा हे दोघे एकत्र भंगार गोळा करून ते विकून मिळालेले पैसे जमा करायचे. परंतु, भंगारचे पैसे दिलेच नाहीत म्हणून अनिल कुमार राई यांनी प्रेमबहादूरच्या डोक्यात दगड घालून हत्या केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसापूर्वी पुण्याच्या बावधनमध्ये अज्ञात व्यक्तीचा डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. हत्या झालेल्या व्यक्ती हा प्रेम बहादूर थापा असल्याची ओळख पटली. याबाबत प्रेमबहादूर थापायची पत्नी हिने हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्त विरोधात तक्रार दिली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या २४ तासाच्या आत आरोपीला जेरबंद केले आहे. हत्या झालेला प्रेमबहादूर आणि अनिलकुमार राई हे दोघे मित्र होते. ते एकत्र भंगार गोळा करून विकायचे. दरम्यान, प्रेमबहादूर याने गोळा केलेले भंगार विकून त्याचे पैसे अनिलकुमार याला दिले नाहीत. याच रागातून अनिलकुमार राई याने प्रेमबहादुर थापाच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. अनिलकुमार राई याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच रंजन सुधीर बिशु आणि रतनसिंह मनोहरसिंह चौहान यांना देखील अधिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा… पिंपरी-चिंचवडकरांवर पाणी कपातीचे संकट; महापालिका प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सुनील दहिफळे, पोलीस निरीक्षक गुन्हे सोन्याबापु देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे, पोलीस कर्मचारी बंडू मारणे, कृष्णादेव शिंदे, योगेश शिंदे, बापूसाहेब धुमाळ, कुणाल शिंदे, कैलास केंगले, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, नरेश बलसाने, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओम प्रकाश कांबळे, सुभाष गुरव आणि सागर पंडित यांच्या टीम ने केली आहे.