राहुल खळदकर, लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : राज्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने राज्यात नगर, ठाणे, येरवडा, पालघर आणि गोंदिया अशा पाच ठिकाणी नवीन कारागृहांचा प्रस्ताव राज्य कारागृह विभागाच्या वतीने महाराष्ट्र गृहनिर्माण कल्याण महामंडळाकडे पाठविण्यात आला आहे. कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे कारागृह यंत्रणेवर ताण पडत आहे. कारागृहात शिक्षा न झालेल्या कैद्यांची (न्यायाधीन बंदी) संख्या वाढत आहे.
राज्यातील सर्व ६० कारागृहांमध्ये २४ हजार ७२२ कैदी ठेवण्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात राज्यातील विविध कारागृहांत ४१ हजार १९१ कैदी आहेत. त्यांपैकी ७० टक्के कच्चे कैदी आहेत. कारागृहाची क्षमता विस्तारित करणे, तसेच कारागृहांची संख्या वाढवणे हेच पर्याय कारागृह प्रशासनाकडे उरले आहेत. राज्यातील पाच ठिकाणी नवीन कारागृह निर्मितीचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. संबंधित प्रस्तावास मंजुरी मिळाल्यावर कारागृह निर्मितीचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, अशी माहिती कारागृह विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातील सर्वात मोठे कारागृह अशी ओळख असलेल्या पुण्यातील येरवडा कारागृहाची क्षमता पुरुष आणि महिला कैदी मिळून दोन हजार ४४९ एवढी आहे. प्रत्यक्षात येरवडा कारागृहात सहा हजार ८२१ कैदी ठेवण्यात आले आहेत. न्यायालयात अनेक खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे कच्च्या कैद्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
राज्यात ४५ ठिकाणी ६० कारागृहे असून राज्यभरातील कारागृहांची बंदी क्षमता २४ हजार ७२२ एवढी आहे. मात्र, प्रत्यक्षात राज्यातील कारागृहांत सध्या ३९ हजार ५४८ पुरुष कैदी, १६२७ महिला कैदी तसेच १६ तृतीयपंथी असे एकूण ४१ हजार १९१ कैदी आहेत. कारागृह विभागाच्या सांख्यिकी अहवालानुसार राज्यात कारागृहातील बंदी क्षमता २०१५ मध्ये २३ हजार ५९२ होती. २०२२ मध्ये ती २४ हजार ७२२ एवढी वाढली. गेल्या सात वर्षांच्या काळात कारागृहात केवळ एक हजार १३० बंदी क्षमता अतिरिक्त वाढली गेली आहे. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांसाठी पुरेशी जागाच कारागृह प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने कारागृहातील पायाभूत सोयी सुविधांवरील ताण वाढला आहे.
पाच नव्या कारागृहांची क्षमता.. नगरमधील नारायणडोह येथे ११ एकरमध्ये ५०० बंदी क्षमतेचे नवीन कारागृह प्रस्तावित असून त्याकरिता ९५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालघर येथे १५०० बंदी क्षमतेचे नवीन कारागृह २५ एकरवर प्रस्तावित असून त्याकरिता एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ठाणे आणि येरवडा (पुणे) या ठिकाणी प्रत्येकी तीन हजार कैदी ठेवण्याची क्षमता असलेले कारागृह बांधणे प्रस्तावित आहे. गोंदिया येथेही ३४९ बंदी क्षमतेच्या नवीन कारागृहाचा आराखडा करण्यात आला आहे.