सियाचिन आणि जम्मू काश्मीरमध्ये तैनात भारतीय लष्कराच्या जवानांचे जगणे सुकर करण्यासाठी प्राणवायू प्रकल्प उभारणाऱ्या योगेश चिथडे (६१ वर्षे) यांचे बुधवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे आई-वडील, बहीण, पत्नी सुमेधा, मुलगा हृषीकेश असा परिवार आहे. चिथडे यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. चिथडे यांनी सुरुवातीला काही काळ भारतीय हवाईदलात काम केले. त्यानंतर स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये त्यांनी काम केले. १९९९ मध्ये पत्नी सुमेधा यांच्या बरोबर त्यांनी सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन (सिर्फ) ची स्थापना केली.