केंद्रातील भाजपा सरकारने ९ वर्ष पूर्ण केली असून या ९ वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत. परंतु, गेल्या नऊ वर्षांत एनडीए सरकारने त्यासाठी काहीही केलं नाही. केंद्र सरकार आपल्या चुका सुधारून जनतेसाठी सुशासन करण्याचा प्रयत्नही करत नाही हे अत्यंत वाईट आहे, असा घणाघाती हल्ला माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला.

मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने काँग्रेसने देशभरातील प्रमुख शहरात पत्रकार परिषदा घेऊन केंद्र सरकारची पोलखोल केली. टिळकभवन येथे पी. चिदंम्बरम यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. “देशाचा कारभार संविधानानुसार चालतो की नाही अशी चिंता वाढत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यातील दरी वाढत असून ही आणखी एक चिंतेची बाब आहे. राज्य सरकारांच्या कार्यकारी अधिकारांमध्ये कपात करण्यात आली आहे. बिगर भाजपशासित राज्यांचे राज्यपाल व्हाईसरॉयसारखे वागत आहेत,” अशी टीका चिदंबरम यांनी केली.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”

“लोकशाहीचे स्वतंत्र आधारस्तंभ असलेल्या संस्था…”

“संसदीय नियम आणि कायद्यांचे उल्लंघन केलं जात आहे. खोट्या केसेस, तपासाच्या धमक्या देऊन राज्य सरकारांना अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. लोकशाहीचे स्वतंत्र आधारस्तंभ असलेल्या संस्था केंद्र सरकारने कमकुवत केल्या आहेत. मोदी सरकारच्या काळात लोकशाहीचा हा वटवृक्ष पोकळ झाला आहे,” असेही चिदंबरम यांनी सांगितलं.

हेही वाचा : कर्नाटकमध्ये १३६ जागा मिळाल्या, आता मध्य प्रदेशसाठीही टार्गेट ठरवलं; वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर राहुल गांधी म्हणाले…

“जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकींपासून…”

“संरक्षण व परराष्ट्र धोरणांवरही केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. पाकिस्तान, चीन, बांग्लादेश, श्रीलंका या शेजारी देशांशी आपले संबंध चांगले राहिले नाहीत. चिनी सैन्याने भारताच्या ताब्यातील भूभागात अतिक्रमण केले आहे आणि आजही ते व्यापलेले आहे, याचे भरपूर पुरावे आहेत. चिन सीमाभागात संरक्षण पायाभूत सुविधा वाढत आहे. तसेच सीमेवर नवीन वसाहती उभारत आहे. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकींपासून भारतीय गस्त घालण्याचे प्रमाण कमी झाले आहे,” असं चिदंबरम यांनी म्हटलं.

“मणिपूर जळत असताना पंतप्रधान व गृहमंत्री…”

“तर दुसरीकडे चीन-पाकिस्तानची युती मजबूत झाली आहे आणि सुरक्षेचा धोका पश्चिम, उत्तर आणि पूर्वेकडील सीमेच्या प्रत्येक भागात पसरला आहे. असे असतानाही संसदेला अंधारात ठेवले आहे. मागील तीन वर्षात देशाच्या सुरक्षेच्या धोक्यांवर संसदेत चर्चा होऊ दिली नाही. मणिपूरमधील चिंताजनक परिस्थिती असून ७५ हून अधिक मृत्यू झाले असतानाही पंतप्रधानांचे सततचे मौन गंभीर आहे. मणिपूर जळत असताना पंतप्रधान व गृहमंत्री कर्नाटकच्या निवडणुक प्रचारात व्यस्त होते,” असं टीकास्र चिदंबरम यांनी डागलं.

हेही वाचा : माजी पंतप्रधान चरण सिंह यांनी सावरकरांची जयंती साजरी करण्यास दिला होता नकार; म्हणाले, “किती लोकांची जयंती…”

“दोन हजाराची नोट चलनात आणणे अन्…”

“अर्थव्यवस्थेचा वेग अत्यंत कमी आहे. प्रचंड बेरोजगारी, सततची महागाई, वाढती असमानता हा ज्वलंत विषय आहे. बेरोजगारीचा दर सध्या ७.४५ टक्के आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा सामान्य जनतेच्या गरजेच्या नव्हत्या. दोन हजाराची नोट चलनात आणणे आणि परत घेण्याच्या भयंकर तमाशाने भारताच्या चलनाच्या अखंडतेवर आणि स्थिरतेवर शंका निर्माण केली आहे, हा निर्णय मुर्खपणाचा आहे. सध्याची परिस्थिती २००४ ते २००९ मधील तेजीच्या वर्षांच्या ९ टक्के वाढीच्या सरासरीपेक्षा खूप दूर आहे,” असेही चिदंबरम म्हणाले.