केसरी-मराठा ट्रस्ट आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‘द हिंदूू’च्या ग्रामीण व्यवस्था विभागाचे माजी संपादक पी. साईनाथ यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘केसरी’चे विश्वस्त- संपादक आणि टिमविचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली.

‘केसरी’च्या च्या १३६ व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी (४ जानेवारी) केसरीवाडा प्रांगणात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पी. साईनाथ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या पत्रकाराला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्काराने गौरविले जाते. या पुरस्काराचे यंदा नववे वर्ष आहे. या कार्यक्रमात अनाथ िहदू महिलाश्रम, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था आणि वसंत व्याख्यानमाला या संस्थांना जयंतराव टिळक स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
जनता माझ्या पाठीशी, शंकर जगताप, राहुल कलाटे हे माझ्यासाठी आव्हान नाही –  नाना काटे
priya bapat and umesh kamat reveals 25 years ago hilarious experience
वांद्रे रेक्लेमेशनजवळ बसलेले प्रिया-उमेश; दुसऱ्या दिवशी थेट वृत्तपत्रात छापून आलेला फोटो, २५ वर्षांपूर्वीचा किस्सा ऐकून पिकला एकच हशा
Devendra Fadnavis and Chandrasekhar Bankules blessing ceremony was held at Nitin Gadkaris residence
विजयी भव! मिसेस गडकरींचा कोणाला आशीर्वाद?
Sanjaykaka Patil
Sanjay Kaka Patil NCP : मोठी बातमी! माजी खासदार संजय काका पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
rajan salvi
आम्ही केलेल्या कामांचे फुकटचे श्रेय घेतले जात आहे – राजन साळवी; पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यावर सडकून टीका
Manohar chandrikapure
अजित पवारांच्या नाराज आमदाराची प्रथम काँग्रेसकडे धाव, नंतर प्रहारमध्ये प्रवेश, महायुतीमध्ये बंडाचा झेंडा

देशातील ग्रामीण वास्तव आणि शेतकरी आत्महत्येचा प्रश्न यावर सातत्याने लेखन करणाऱ्या साईनाथ यांना विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कारांबरोबरच रामनाथ गोयंका पुरस्कार, प्रेम भाटिया स्मृती पुरस्कार, ग्रामीण पत्रकारितेबद्दल ‘द स्टेटमन’ पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. युरोपियन संघाचा पुरस्कार पटकाविणारे ते पहिले भारतीय पत्रकार आहेत.