वार्ताहर, लोकसत्ता

इंदापूर : पळसदेव (काळेवाडी )ता. येथील येथील प्रगतिशील शेतकरी रामदास दगडू चव्हाण यांनी दोन एकर कलिंगडाच्या पीकातून अवघ्या पासष्ट दिवसात साडे पाच लाख रूपयांचे उत्पन्न मिळवले आहे. दोन लाख रुपये उत्पन्न खर्च वजा जात दोन महिन्यात साडेतीन लाख रूपये नफा झाला आहे . शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन फळबाग लागवड करून केवळ दोन महिन्यात साडेतीन लाखाचा निव्वळ नफा मिळवला आहे.

योग्य वेळी लागवड ठिबक सिंचनाचा वापर वेळोवेळी खतांच्या मात्रा, व पीकाची व्यवस्थित देखभाल केल्यास निश्चितच हुकमी उत्पादन घेता येते. असे चव्हाण यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. दोन एकर शेतात ऊस गाळपाला गेल्यावर पुन्हा उसाकडे वळण्यापेक्षा प्रथमच शेतात कलिंगड लागवड केली . शेतात नांगरट ,कल्टीव्हेटर मारुन बेड सोडण्यासाठी याला सतरा हजार खर्च केला व शेतात सहा फूट बाय दीड फुटावर सिम्बा जातीच्या सुमारे १६ हजार कलिंगड रोपाची लागवड केली .

रोपासाठी १.रुपया ६० पैसे रुपये दराने २५ हजार रुपये रोपाचा खर्च आला .संपूर्ण पिकाला ड्रीप दवारे पाणी दिले .ड्रीप साठी ३७ हजार खर्च करून चांगल्या प्रकारे पाणी व्यवस्थापन केल . रोप लागवडी पासून दोन महिना खत व औषध याचा खर्च असा मिळून दोन लाख रुपये उत्पन्न खर्च आला . ठिबक सिंचन पुन्हा उपयोगी पडणारे असल्याने पुढील पीकाचा खर्च कमी होणार आहे.

औषधामध्ये तीन वेळा ड्रीचिंग केलं . त्यात ड्रायकोडर्मा ,व पाण्यात विरघळणार्या खतांचा योग्य वापर केला . वाढीच्या अवस्थेत ऑक्साईड व जिवाणू खते वापरली व रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशक वापरले . त्यामुळे पिकाला रोगाचा अधिकच धोका बसला नाही . असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

दोन एकरात सुमारे ५५ टन उत्पन्न निघाले व याचा दर सध्या १० रुपये दराने कलिंगडाची थेट शेतीतूनच व्यापाऱ्याला विक्री केली यामध्ये एकूण साडेपाच लाख रुपयाचं उत्पन्न झाले . उत्पादन खर्च वजा जात सुमारे साडेतीन लाख रुपयाचा फायदा झाला . तोही दोन महिन्यात त्यामुळे चव्हाण यांनी समाधान व्यक्त केलं . एवढी वर्ष ऊसाचा नादी लागलो.मात्र उसापेक्षा फळबागातून शेतकऱ्याची झपाट्याने प्रगती होऊन शकते .असा विश्वास या वेळी चव्हाण यांनी व्यक्त केलं.

उत्पन्न घेण्यासाठी राहुल बनसुडे , सोहेल सय्यद यांनी बांधावर जाऊन वेळोवेळी खत ,औषधे व रोग व्यवस्थापन या बाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे मला समाधानकारक उत्पन्न घेता आले असल्याचं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं . व इतर शेतकऱ्यांनी केवळ उसाच्या अधिक नादी न लागता फळबागा चे उत्पन्न घेतल्यास नक्कीच याचा फायदा होईल. फळबागांना खर्च होतो मात्र उत्पन्न अधिक मिळत व अगदी कमी काळात मिळत त्यामुळे उजनी काठावरील शेतकऱ्यांनी ऊस सोडून फळबागांकडे वळावं त्यात नक्कीच त्यांचा फायदा होईल . आता या पिकानंतर पुन्हा लगेच याच बेडवर पुन्हा फळ पीकाची लागवड करणार असल्याचं त्यांनी सांगितले .व या वेळी बेड व ड्रिपचा देखील खर्च कमी होणार असल्याचं मत यावेळी चव्हाण यांनी व्यक्त केले.

Story img Loader