संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे शहरात येणार आहे. या पालखी सोहळ्यात दरवर्षी संभाजी भिडे गुरुजी असंख्य धारकऱ्यांसोबत सहभागी होतात. यात वारकरी आणि धारकऱ्यांमध्ये वादाचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संभाजी भिडे गुरुजी यांना नोटीस बजावली आहे.
हेही वाचा – लोणावळा : भुशी धरण ओव्हरफ्लो; पर्यटकांची गर्दी
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले आहे. तर त्यापूर्वी संभाजी भिडे गुरुजी शिवाजीनगर भागातील जंगली महाराज येथे आले असून असंख्य धारकरी आहेत. पुणे पोलिसामार्फत तुकाराम महाराज पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. त्याबाबत काळजी घ्या, तसेच तेढ निर्माण करणारे भाषण करू नका, अशा स्वरुपाची नोटीस संभाजी भिडे गुरुजींना बजावली आहे.