पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर महाविकास आघाडीत गेले तर, त्याचा काय परिणाम होईल आणि निवडणुकीत त्याचा किती फटका बसेल, याची चर्चा भाजपच्या सुकाणू समितीच्या बैठकीत होईल. मात्र जानकर यांच्याबरोबर चर्चा करण्याची जबाबदारी भाजपने दिली तर त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे राज्याच्या माजी महिला आणि बालकल्याण मंत्री आणि भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी येथे सांगितले. भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाला पंकजा यांनी गुरुवारी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पीडब्ल्यूडी मंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा हवेतच

बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून मराठा उमेदवार दिला जाणार आहे. तशी तयारी महाविकास आघाडीकडून सुरू झाली आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवार मराठा असल्यास किती प्रमाणात फटका बसले, अशी विचारणा केली असात पंकजा म्हणाल्या की, बीड अत्यंत पुढारलेला जिल्हा आहे. बीड जिल्ह्याने आत्तापर्यंत वेगवेगळ्या समाजाचे खासदार निवडून दिले आहेत. अल्पसंख्यांक समाजाचा खासदाही बीडने दिला आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने बीड मध्ये मतदान होते हे स्पष्ट होत आहे. बीड जिल्ह्याची पालकमंत्री असताना प्रत्येक जाती-धर्माच्या व्यक्तींशी संबंध आला. माझ्याबद्दल कोणाच्याही मनात कटुता नाही. राजकीय जीवनातही कोणाला कटुता वाटेल, असे वर्तन मी केले नाही. माझे धोरण सर्वसमावेशक राहिलेअसून निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला केवळ उमेदवार म्हणूनच कायम पाहिले. उमेदवार कोणत्या जातीचा हे पहात नाही. लोकसभेची निवडणूक नवीन नाही. मतदारसंघात केलेली विकासकामे आणि लोकांचा माझ्यावरील विश्वास यामुळेच लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी मला मिळाली आहे. राज्यातील प्रचाराची जबाबदारी अन्य नेत्यांकडे आहे. ती जबाबदारी ते योग्य पद्धतीने पार पाडतील. पक्षाने प्रचाराची जबाबदारी दिल्यास त्यादृष्टीनेही नियोजन करण्यात येईल. मी लोकसभा निवडणुकीची उमेदवार असल्याने सध्या मी बीड मतदारसंघात लक्ष केंद्रीत केले आहे, असेही पंकजा यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde ready to negotiate with mahadev jankar to bring him back in nda pune print news apk 13 zws