चिंचवडच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या ग्रामस्थांच्या मेळाव्यात राजकीय शेरेबाजी झाली. आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीकडून पदांचा उपभोग घेतला. मात्र, जनतेचे प्रश्न सुटत नसल्याचा कांगावा करत पक्षाची उमेदवारी नाकारण्याचे नाटक केले. जे प्रश्न विधानसभेत सोडवता आले नाहीत, ते जगताप लोकसभेत जाऊन काय सोडवणार, अशी टीका काँग्रेस नेते आझम पानसरे यांनी या वेळी केली.
काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यात पानसरे, विरोधी पक्षनेते विनोद नढे, नगरसेवक गणेश लोंढे, संदीप चिंचवडे, आरती चोंधे, विमल काळे, माजी नगरसेवक मधुकर चिंचवडे, तानाजी वाल्हेकर, विजय लांडे, राजू गोलांडे, बाबू नायर, नाना थोरात, विनायक रणसुभे, श्रीधर वाल्हेकर, मनोज कांबळे आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पानसरे म्हणाले,की लक्ष्मण जगताप यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार अशी अनेक पदे घेतली. आता अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटत नाही म्हणून ते राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यांना जे प्रश्न विधानसभेत सोडवता आले नाहीत, ते लोकसभेत जाऊन सोडवणार का, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. आता मी काँग्रेसमध्ये आलो असल्याने काँग्रेसची ताकद वाढवू, पक्षाचा मेळावा घेऊ, असे ते म्हणाले. भोईर म्हणाले,‘‘ श्रीरंग बारणे यांना काँग्रेसमध्ये मी तिकीट दिले होते. त्या वेळी अजित पवारांशी भांडलो होतो. मात्र, नंतर माझी वेळ आली तेव्हा ते विरोधात गेले व माझा पराभव घडवून आणला. माझा सतत उपयोग करून घेतला गेला. लढ म्हणणाऱ्यांनी पािठबा दिला नाही. २५ वर्षांपासून पक्षनिष्ठ आहे. माझ्यावर वेळ आली तर कोणी पाठिशी राहत नाही. मित्र म्हणवणाऱ्यांनी गद्दारी केली,’’ अशी टीका त्यांनी केली. विनोद नढे म्हणाले, भोईर जिथे असतील, तिथे आपण राहू. खूप त्रास सहन करून त्यांनी आपल्याला पद मिळवून दिले. सूत्रसंचालन अशोक भालके, राजू चिंचवडे यांनी केले. कैलास गावडे यांनी आभार मानले.
विधानसभेत प्रश्न सुटले नाहीत; लोकसभेत काय सोडवणार – पानसरे यांची जगताप यांच्यावर टीका
जे प्रश्न विधानसभेत सोडवता आले नाहीत, ते जगताप लोकसभेत जाऊन काय सोडवणार, अशी टीका काँग्रेस नेते आझम पानसरे यांनी या वेळी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-03-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pansare criticise laxman jagtap