जनसुनावणीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्याची लवकरच नेमणूक
पनवेल शहर महानगरपालिका निर्मिती प्रक्रियेला येत्या आठ दिवसांत सुरुवात होईल. यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे राज्याच्या नगरविकास विभागातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. रायगड जिल्हाधिकाऱ्यांसमोर महानगरपालिकेसंदर्भात हरकती नोंदविल्यानंतर जनसुनावणी होणे अपेक्षित होते; परंतु येत्या आठ दिवसांत कार्यवाही सुरू होईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर जनसुनावणीचा कार्यक्रम होईल.
पनवेल नगर परिषद हद्दीतील शहर आणि वसाहती, सिडको क्षेत्रातील २१ गावे, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित (नैना) क्षेत्रातील ३६ गावे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील ११ गावांचा समावेश केला जाईल. शहर आणि ६८ गावे एकत्रित करून त्यात पाच लाख ९५ हजार लोकसंख्या गृहीत धरलेली आहे. सुमारे १८ हजार हेक्टर जमिनीवरील क्षेत्र महानगरपालिकेत विलीन करण्याविषयीची प्राथमिक अधिसूचना सरकारने काढली होती. त्यानंतर खारघरमधील रहिवाशांनी नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश करण्याची मागणी केली होती.
करंजाडे, पुष्पकनगर, प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित गावांना या पनवेल महानगरपालिकेतून अभ्यास समितीने वगळल्याने या गावांचाही समावेश करावा, अशा सूचना ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. काही राजकीय पक्षांनी सरकारच्या या दुटप्पीपणावर टीका केली होती. त्यातच निवडणूक आयोगाने जुन्या पनवेल नगर परिषदेचा निवडणूक कार्यक्रम हाती घेतला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा