पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेत आज एमबीए अभ्यासक्रमातील लीगल ॲस्पेक्ट ऑफ ऑफ बिझनेस या विषयाचा पेपर फुटल्याचे उघडकीस आले आहे. एका परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचे समाजमाध्यमाद्वारे दिसून आले असून, या विषयाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. आता या विषयाची परीक्षा २६ डिसेंबरला होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा >>> नांदेड सिटीतील सदनिकाधारकांनो, मालमत्ताकर सवलतीचा अर्ज भरू नका!… माजी नगरसेवकांनी का केले हे आवाहन?

विद्यापीठाच्या ऑक्टोबर २०२३ सत्राच्या परीक्षा २१ नोव्हेंबरपासून सुरळीतपणे सुरू आहेत. काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा या त्यांच्या सत्रपूर्तता कालावधीनुसार आयोजित केलेल्या आहेत. त्यात एमबीए अभ्यासक्रमाची परीक्षा ११ डिसेंबरपासून सुरु झालेल्या आहेत. आज (२२ डिसेंबर) प्रथम वर्ष एमबीए २०१९ रिव्हाईज, प्रथम सत्रातील १११- -लीगल ॲस्पेक्ट ऑफ ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका एका परीक्षा केंद्रामधून प्रसारित झाल्याचे काही समाजमाध्यमांव्दारे दिसून आलेले आहे. परीक्षांची संवेदनशीलता, गोपनीयता व पावित्र्य लक्षात घेता २२ डिसेंबर रोजीच्या प्रथम वर्ष एम.बी.ए. २०१९ रिव्हाईज प्रथम सत्रातील १११ लीगल ॲस्पेक्ट ऑफ ऑफ बिझनेस या विषयाची परीक्षा रद्द करण्यात येत आहे. या विषयाची परीक्षा २६ डिसेंबरला  सकाळी १०.०० ते १२.३० या वेळेत आयोजित करण्यात येत आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

Story img Loader