पुणे: वाहतूक पोलिसाच्या डोक्यात दगड घालणाऱ्या तरुणाला पोलिसांनी धाराशिव परिसरातून अटक केली. आरोपी तरुणाची हडपसर भागातील भेकराईनगर परिसरातून पोलिसांनी धिंड काढली. आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. बबलू अण्णा मासाळ (वय ३५, रा. धाराशिव ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध काळेपड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास करुन त्याला धाराशिवमधून अटक केली. त्याने केलेल्या हल्ल्यात पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक (वय ४७) हे गंभीर जखमी झाले होते.

पोलीस हवालदार नाईक वाहतूक शाखेत नियुक्तीस आहेत. ते गुरुवारी (६ फेब्रुवारी) सायंकाळी सहाच्या सासवड रस्त्यावरील भेकराईनगर परिसरात वाहतूक नियंत्रण करत होते. दुचाकीस्वार मासाळ रस्त्यात मधेच थांबून मोबाइलवर बोलत थांबला होता. त्यामुळे पाठीमागील बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती. नाईक यांनी त्याला बाजूला होण्यास सांगितले. राग आल्याने त्याने हवालदार नाईक यांना धक्काबुक्की केली., तसेच त्यांच्या डोक्यात दगड घातला. या घटनेनंतर तो तेथून पसार झाला. या हल्ल्याची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली होती, गंभीर जखमी झालेल्या हवालदार नाईक यांना तातडीने खासगी रुग्णलायात दाखल करण्यात आले.

Thieves arrested after robbing motorist in Salisbury Park in Pune news
पुणे: सॅलिसबरी पार्कात मोटारचालकाला लुटणारे चोरटे गजाआड
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Marijuana worth six lakh rupees seized in Parbhani
परभणीत सहा लाख रुपये किमतीचा गांजा जप्त
Two wheeler thief arrested from rural area Pune print news
ग्रामीण भागातून दुचाकी चोरणारा गजाआड; वाशिममधील चोरट्याकडून ११ दुचाकी जप्त
mhalunge police arrested house robber seizing 26 jewelry pieces worth ₹18 lakh
घरफोडीतील आरोपी टी-शर्टच्या आधारे ओळखून पकडला
mobile theft pimpri loksatta news
रेल्वे स्थानकावर मुक्काम, दिवसभर मोबाईलची चोरी आणि…
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Sangli Crime News
Sangli Crime : सांगलीत १०० रुपयांचं स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या, तिघांना अटक

या घटनेनंतर मासाळ त्याच्या मूळगावी धाराशिवला पसार झाला होता. तो कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला धाराशिवला मधून अटक केली. पोलिसांनी भेकरेनगर परिसरातून त्याची धिंड काढली. काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader