पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शनिवारी याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विद्यापीठाकडून अधिकृत घोषणाही करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुरेश गोसावी यांची जूनमध्ये निवड झाली. त्यानंतर प्र-कुलगुरू म्हणून कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले होते. विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलानुसार प्र कुलगुरू पदासाठी कुलगुरूंनी केलेल्या नामनिर्देशनाला व्यवस्थापन परिषदेने मान्यता देणे आवश्यक आहे. त्यानुसार कुलगुरूंची निवड झाल्यानंतर लगेचच प्र कुलगुरूंची निवड होणे अपेक्षित होते. मात्र जवळपास ८० दिवस प्र कुलगुरूंची निवड झाली नव्हती. अखेर डॉ. गोसावी यांनी केलेल्या डॉ. पराग काळकर यांची शिफारस केली. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेत चर्चा करून डॉ. काळकर यांची प्र कुलगुरू पदावर नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे डॉ. काळकर यांचा कुलगुरू पदासाठीच्या पाच अंतिम उमेदवारांमध्ये समावेश होता. मात्र त्यांची कुलगुरूपदी निवड होऊ शकली नाही.

हेही वाचा – समाविष्ट गावांचा विकास लांबणीवर, आराखडा प्रसिद्ध करण्यास पुन्हा मुदतवाढ

हेही वाचा – पुणे: तीन वर्षांच्या चिमुकलीचे केस ओढले, गालाला चिमटे; शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल!

डॉ. काळकर यांनी या पूर्वी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. तसेच सिंहगड संस्थेच्या महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parag kalkar has been appointed as pro chancellor of savitribai phule pune university pune print news ccp 14 ssb
Show comments