वैद्यकीय क्षेत्र म्हटलं, की रुग्णालय, डॉक्टर, परिचारिका आणि वेगवेगळ्या तपासण्या करणारे तंत्रज्ञ असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. डॉक्टरांचा अपवाद वगळला तर बाकीच्या सेवा देणारे तेवढे कुशल आणि ज्ञानाने अद्ययावत असतील याची शाश्वती नसते. त्यामुळेच पॅरामेडिकल क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉपरेरेशनने नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार, आरोग्य क्षेत्रात २०१३ मध्ये कार्यरत असलेली ३५ लाख ही कर्मचाऱ्यांची संख्या वाढून २०२२ पर्यंत ७४ लाख होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याचाच अर्थ सध्या कार्यरत असलेल्या कर्मचारी संख्येच्या दुप्पटीपेक्षाही मागणी अधिक आहे. माफक दरामध्ये उत्तम आरोग्य सेवा आणि रुग्णाची आपुलकीने घेतली जाणारी काळजी यामुळे जगभरामध्ये वैद्यकीय पर्यटनासाठी भारताला प्राधान्य दिले जाते. भविष्यामध्ये वैद्यकीय पर्यटन माध्यमामध्ये १० लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रुग्णालयामध्ये असलेल्या रुग्णासाठी डॉक्टर केवळ दोन टक्के म्हणजे २० मिनिटे देऊ शकतात. उर्वरित ९८ टक्के वेळामध्ये पॅरामेडिकल कर्मचारी हेच त्या रुग्णाची देखभाल करीत असतात. त्यामुळे पॅरामेडिकल कर्मचारी हेच आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये कणा आहेत, असे रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. देविदास भालेराव यांनी सांगितले.
पॅरामेडिकल पदविकाधारकांसाठी चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध असून त्यांना अद्ययावत ज्ञान आणि तंत्रज्ञान हाताळण्याची कुशलता देणारे अभ्यासक्रम कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूटने सुरू केले आहेत. अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (पॅथॉलॉजी), अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन मेडिकल इमेिजग टेक्नॉलॉजी रेडिओलॉजी, अॅनेस्थेशिया अँड क्रिटिकल केअर टेक्नॉलॉजी, रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी आणि ऑप्टोमेट्री अँड आप्थॅल्मिक टेक्नॉलॉजी या चार अभ्यासक्रमांचा समावेश आहे. दोन वर्षांचा हा पदविका अभ्यासक्रम असून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर जोशी यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा