पुणे : गणेशोत्सवामध्ये नवव्या दिवसापर्यंत गणेशाचे विसर्जन करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून शहरातील विसर्जन घाट आणि परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्याच्या दृष्टीने नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

गणेशोत्सवामध्ये अनेक जण पाचव्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन करतात. काही भाविक गौरीनंतर सातव्या आणि नवव्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन करतात. सातव्या दिवशी काही मंडळांकडून मिरवणुका काढून विसर्जन केले जाते. ही मिरवणूक निर्विघ्न आणि शांततेत पार पडावी. वाहतूक कोंडी होऊन अडथळा येऊ नये यासाठी पुणे पोलिसांच्या बंदोबस्तासह वाहतूक विभागाकडून विसर्जन मार्गासह विसर्जन घाट परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात येतो.

४ सप्टेंबरला उत्सवाचा पाचवा दिवस, ६ सप्टेंबरला सहावा, तर ८ सप्टेंबरला नववा दिवस आहे. या तीनही दिवशी विसर्जनासाठी घाटावर गर्दी असते. त्यातून होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विसर्जनासाठी आणण्यात येणारी वाहने गणेशाची मूर्ती उतरविल्यानंतर संबंधित ठिकाणावरून हलवावीत. भाविकांनी त्यांची वाहने उपलब्ध करून दिलेल्या जागेवरच लावावीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

विसर्जन घाट ठिकाण आणि पार्किंग व्यवस्था

ठिकाण : अप्सरा टॉकीजजवळील कॅनॉल (पंडित जवाहरलाल नेहरू रस्ता)

पार्किंग : पंडित नेहरू रस्त्यावर वाहने अप्सरा टॉकीजचे बाजूस लावावीत.

ठिकाण : चिमाजी आप्पा पेशवे पथावरील सावरकर पुतळ्याजवळील कॅनॉल (मित्रमंडळ सावरकर चौक दरम्यान)

पार्किंग : चिमाजी आप्पा पेशवे पथावर कॅनॉलचे पुढे मित्रमंडळ चौकापर्यंत पाटील प्लाझाच्या डाव्या बाजूस तसेच सावरकर पुतळा चौकापासून ते पेशवे पार्क या सिंहगड रोडवर सारसबागेचे बाजूस वाहने लावावीत.

ठिकाण : संगमपूल घाट (आरटीओजवळ मोतीलाल रस्त्यावर)

पार्किंग : संगम पूल येथील राजाबहादुर मिल रस्त्यावर जुने सीआयडी कार्यालय ते आरटीओ चौक येथे दोन्ही बाजूस भिंतीस लागून, तसेच एस.एस.पी.एम.एस. मैदानाच्या बाजूसही वाहने लावावीत.

ठिकाण : एस. एम. जोशी पुलाखाली (गरवारे महाविद्यालयाच्या मागे),

पार्किंग : एस. एम. जोशी पुलाजवळ गरवारे महाविद्यालयाच्या मागील बाजूस आणि ठोसर बागेसमोरील स्टेट बँक (वैकुंठ स्मशानभूमी रोड)

ठिकाण : बाबा भिडे पूल दोन्ही बाजूस (डेक्कन पीएमपीएमएल बसथांब्याजवळ)पार्किंग : बाबा भिडे पूल दोन्ही बाजूस नदी पात्रातील मोकळी जागा.

Story img Loader