लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : गुजरात राज्य संगीत अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या पं. नंदन मेहता शास्त्रीय तालवाद्य स्पर्धेच्या पखवाज वादनामध्ये ज्येष्ठ पखवाजवादक तुकारामबुवा भूमकर यांचे नातू पार्थ भूमकर द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ठरले.

अहमदाबाद येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात पार्थ यांना प्रसिद्ध कलाकार शुभ महाराज, अक्रम खान आणि पं. दलचंद शर्मा यांच्या उपस्थितीत पारितोषिक प्रदान करण्यात आले. १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

वयाच्या चौथ्या वर्षांपासून आजोबा आणि वडील अमित भूमकर यांच्याकडून पखवाज वादनाचे धडे घेण्यास सुरुवात केलेल्या पार्थ यांचे पखवाजवादक म्हणून वयाच्या आठव्या वर्षीच त्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पं. रविशंकर यांच्या उपस्थितीत नाव नोंदले गेले. २०२१ मध्ये त्यांनी मृदंग विशारद पदवी संपादन केली. अनेक स्पर्धामधून एकल वादन करणाऱ्या पार्थ यांनी पं. सुरेश तळवलकर यांच्या ‘तालयात्रा’ कार्यक्रमात अनेकदा वादन केले आहे. मोहनवीणावादक पं. विश्वमोहन भट, तबलावादक पं. विजय घाटे आणि प्रसिद्ध गायिका मंजूषा पाटील यांना पखवाज वादनाची साथ करणारे पार्थ सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित केंद्रात पखवाजवादनात एम. ए. करत आहेत.