पार्थ पवार यांनी चिंचवड विधानसभेवर दावा केला आहे. चिंचवडमधून आम्ही विठ्ठल उर्फ नाना काटे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. पार्थ पवार हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यामुळं महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंचवड विधानसभेत भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आहेत. महायुतीमधून त्यांच्यासह शहराध्यक्ष शंकर जगताप, शत्रूघ्न काटे, चंद्रकांत नखाते हेदेखील इच्छुक आहेत. पार्थ पवार यांनी चिंचवड विधानसभेवर दावा केल्याने भाजपकडून प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पुणे : वडगावशेरी भागातील नागरिकांनी अजित पवारांसमोर वाचला समस्यांचा पाढा

हेही वाचा – पुणे : वैमनस्यातून अल्पवयीनावर कोयत्याने वार

पार्थ पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. शहरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. उद्या होणाऱ्या जनसन्मान यात्रेचे नियोजन पार्थ पवार यांच्याकडे आहे. आज नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त पार्थ पवार हे त्यांच्या कार्यालयात पोहोचले. तिथं, नाना काटे यांचा ‘भावी आमदार’ असा उल्लेख असलेला केक पार्थ पवार आणि नाना काटे यांनी कापला. यामुळं एकच चर्चा रंगली. पार्थ पवार म्हणाले, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. नाना काटे हे आमदार व्हायला पाहिजेत. त्यांचे माझे चांगले संबंध आहेत. त्यांना आमदार करायचं आहे. त्यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parth pawar claim on chinchwad assembly what did he say about nana kate kjp 91 ssb