पिंपरी- चिंचवड शहरातील पूरस्थितीचा अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आढावा घेतला. गेल्या काही तासांपासून पिंपरी- चिंचवड सह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे पिंपरी- चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीला पूर आलेला आहे. नदीचे पाणी अनेकांच्या घरात शिरलं आहे. या कुटुंबाशी पार्थ पवार यांनी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली.

पिंपरी- चिंचवड सह लोणावळा आणि मावळ परिसरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस झाला आहे. पवना धरणातून आठ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळेच पिंपरी- चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी काठच्या घरात पाणी शिरल आहे. याचाच आढावा आज अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी घेतला आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अण्णा बनसोडे आणि कार्यकर्ते होते. मात्र, पिंपरी- चिंचवड शहरात पार्थ पवार यांनी लक्ष दिल्याने आणि पूरग्रस्तांची पाहणी केल्याने अनेक चर्चेंला उधाण आल आहे.

Story img Loader