पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक होती. सकाळी नऊनंतर मतदान केंद्रावरील गर्दी आणखी वाढल्याचे दिसून आले. त्यात तरुणांचे प्रमाण अधिक होते. पर्वती विधानसभा मतदारसंघात प्रशासनाने महिला मतदार केंद्रासोबत आदर्श मतदान केंद्रांचे नियोजन केले.

मतदान केल्यानंतर मतदारांना सेल्फी काढण्यासाठी मतदान केंद्राबाहेर सेल्फी पॉइंटची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये तरुण मतदार मतदान केल्यानंतर उत्साहाने सेल्फी घेत असल्याचे दिसून आले. मतदारांची गर्दी दुपारनंतर ओसरू लागली. पुन्हा सायंकाळनंतर मतदारांच्या रांगा लागल्या. यामुळे मतदानाची वेळ संपल्यानंतर काही ठिकाणी मतदान केंद्रे सुरू असल्याचे दिसून आले. पर्वती मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यानंतर ९ वाजेपर्यंत दोन तासांत ६.३० टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी ३ पर्यंत ३७.६६ आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६५ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात पैसेवाटपाच्या आरोपामुळे मंगळवारी (ता. १९) राजकीय नाट्य घडले होते. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीत मतदान शांततेत आणि सुरळीतपणे पार पडले.

one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका

हेही वाचा >>>बारामतीत राडा… मतदान चिठ्ठ्यांवर घड्याळाचे चिन्ह?

पर्वती विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत झाली. महायुतीकडून भाजपच्या माधुरी मिसाळ, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या अश्विनी कदम आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागूल हे तिघे मैदानात होते. मागील विधानसभा निवडणुकीत मिसाळ आणि कदम यांच्यात लढत झाली होती. यंदा दोघी पुन्हा आमनेसामने आहेत. भाजप आणि माधुरी मिसाळ यांच्यासमोर हा मतदारसंघ राखण्याचे आव्हान आहे. याच वेळी मागील वेळचा पराभव विजयात परिवर्तित करण्याचे आव्हान अश्विनी कदम यांच्यासमोर आहे. या मतदारसंघात सुरुवातीला महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरीचे वारे होते. महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश आले. मात्र, महाविकास आघाडीला आबा बागूल यांची बंडखोरी रोखता आली नाही. त्यामुळे बागूल यांची निवडणुकीतील कामगिरी मिसाळ आणि कदम यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

हेही वाचा >>>खराब हवेमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढला! संशोधनातील निष्कर्ष; काळजी घेण्याचा आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला

पर्वतीतील चित्र

– सकाळपासून मतदारांचा उत्साह

– मतदानानंतर सेल्फी काढण्याकडे तरुणांचा कल

– ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरची सुविधा

– लहान मुलांसाठी मतदान केंद्रावर पाळणाघर

– मतदान केंद्रांवर सायंकाळनंतर मोठी गर्दी

Story img Loader