प्रवाशाने पीएमपी वाहकाच्या अंगठ्याच्या चावा घेतल्याची घटना हडपसर भागातील गाडीतळ स्थानकात घडली. या प्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली. शिवराज साळुंखे (वय ३०, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याबाबत पीएमपी वाहक मारुती बाळू सांगळे (वय ३९, रा. नायगाव रस्ता, कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एनडीए ते हडपसर या मार्गावरील बस हडपसर येथील गाडीतळ स्थानकात थांबली. त्या वेळी आरोपी साळुंकेने बसमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला. त्या वेळी सांगळे यांनी बस मार्गस्थ व्हायची आहे, असे साळुंखे याला सांगितले. तेव्हा साळुंखे पीएमपी वाहक सांगळे यांच्यावर चिडला. मी पूर्वी पीएमपीमध्ये चालक होतो. तू मला शिकवू नको, असे साळुंखेने सांगितले. साळुंखेने सांगळे यांना शिवीगाळ करुन अंगठ्याचा चावा घेतला. त्यानंतर साळुंखेला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करत आहेत.

Action on encroachments in development plan near Durgadi Fort in Kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील ४० फुटी रस्त्यावरील २२ अतिक्रमणे जमीनदोस्त,भटाळे तलाव बुजवून उभारली होती बेकायदा बांधकामे
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Uran Panvel Lorry Owners Association held press conference demanding local employment
करंजा टर्मिनलवर रोजगारासाठी स्थानिक भूमीपुत्राचा एल्गार, उरण पनवेल लॉरी मालक संघाच्या वाहनांना काम देण्याची मागणी
Wardha dead bodies reservoir, Wardha,
वर्धा : जलाशयात आढळले तीन मृतदेह, दोघांची ओळख पटली; पूरबळी संख्या सात
Navapada, illegal building at Navapada,
सामासिक अंतर न सोडता डोंबिवलीतील नवापाड्यात आठ माळ्याच्या बेकायदा इमारतीची उभारणी
What alternative routes are available for transportation during the Girgaon Ganesh Visarjan procession Mumbai news
गिरगावात मिरवणूक बघायला जाताय,या रस्त्यांवर प्रवास टाळा
treaa cutting in thane
डोंबिवलीत विकासकाकडून जुनाट झाडांची कत्तल; उद्यान विभागाला लेखी खुलाशातून कबुली
Koper news
डोंबिवली: कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी