पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. प्रवीण बालाजी कोका (वय २८, रा. हैद्राबाद, तेलंगणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अमर चकराल (वय ४४, रा. बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण कोका सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ परिसरात कामाला आहे. तो दिवाळीनिमित्त बिबवेवाडीत राहणाऱ्या आत्याला भेटायला आला होता. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास तो सोलापूरहून आलेल्या बसमधून एसटी स्थानकात उतरला. तेथून तो बिबवेवाडीकडे निघाला होता. एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वारात एसटी बसने प्रवीणला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. भरधाव बस चालवून प्रवाशाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बी. पी. शिरसाट तपास करत आहेत.