लोणावळा ते पुणे रेल्वे स्थानक लोकल सेवा पूर्ववत व्हावी यासाठी आज लोणावळ्यात काही चाकरमान्यांनी आंदोलन केले. तळेगाव आणि पिंपरी- चिंचवडमधून लोणावळ्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने शटल सेवा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- ‘सावधान! नवले ब्रिज पुढे आहे’; सतत अपघात होणाऱ्या नवले ब्रिजवर लागले अनोखे बॅनर

शेकडो नोकरदार पुणे ते लोणावळा दरम्यान रेल्वेने प्रवास करत असतात. पण, लोकलसेवा सेवा पूर्ववत राहिली नसल्याने जुन्या वेळापत्रकानुसार लोकल सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नोकरदार वर्ग करत आहेत. अनेकदा तळेगाव स्थानकात किंवा लोणावळ्यात तासंतास लोकलची वाट पहावी लागते. यामुळं नोकरदारवर्ग नाराज आहे. रेल्वे सेवा देत असताना लोकलने उशीर करू नये, शटल सेवा सुरू करावी, जुन्या वेळापत्रकानुसारच रेल्वे सेवा पूर्ववत करावी, सर्व लोकल पुणे ते लोणावळा असाव्यात, अशा मागण्या चाकरमान्यांच्या आहेत. रेल्वेच्या फलाटावर आंदोलन करत असताना रेल्वे पोलिसांनी हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला. महिलांचा सहभाग देखील या आंदोलनात लक्षणीय होता.