पुणे : पुणे रेल्वेस्थानकाच्या पार्सल विभागाकडील प्रवेशद्वाराजवळ वाढलेल्या बेकायदा टपऱ्या आणि सीमाभिंतीचा लघुशंकेसाठी वापर होत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरत असून, प्रवाशांना त्रास होत आहे. याबाबत रेल्वे विभागाने पुणे महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे.

रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना किंवा बस स्थानकाकडे जाताना अनेक नागरिक आणि प्रवासी उघड्यावर लघुशंका करत असल्याने या परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. याबाबत महिला प्रवाशांकडून तक्रारी वाढल्या असल्याने रेल्वे विभागाच्या व्यवस्थापिका इंदू दुबे यांनी या परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांशी संपर्क साधत यावर तातडीने कारवाई करण्याची सूचना केली.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा

हेही वाचा >>>वडाचीवाडी परिसरात गावठी दारू तयार करणारे गजाआड; चार हजार लिटर गावठी दारु, १२ हजार लिटर रयासन जप्त

पुणे रेल्वेस्थानकाच्या परिसरामध्ये दिवस-रात्र प्रवासी, नागरिकांची वर्दळ असते. येथील वाहनतळाच्या सीमाभिंतीलगत मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थांच्या, विविध वस्तू विक्रीच्या टपऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बुहतांश टपऱ्या गुटखा, पान विक्रीच्या असल्याने प्रवाशांना रेल्वेस्थानकात प्रवेश करताना त्रास होतो. पार्सल विभागाच्या सीमाभिंतींलगतच्या अनेक टपऱ्या बंद अवस्थेत असून, या ठिकाणी भरदिवसा नागरिक, प्रवासी लघुशंका करत असतात. याबाबत महिला प्रवाशांकडून तक्रारी आल्या आहेत, अशी माहिती दुबे यांनी दिली.

पार्सल विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ वाहनांची वर्दळ असून बेकायदा टपऱ्या आणि सीमाभिंतींचा लघुशंकेसाठी होणारा वापर यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली असून प्रवाशांच्या आरोग्याचे प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित टपरीधारकांवर आणि लघुशंका करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात महापालिका आयुक्त यांंना संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे, असेही दुबे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>पिंपरी: बेकायदा फलक लावणाऱ्या दाेघांवर गुन्हे; ४६ हजारांचा दंड वसूल

रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बाजूस मोफत शौचालय आहे. प्रवासी आणि नागरिकांनी या शौचालयाचा वापर करावा. महिलांना लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करू नये, असे आवाहन दुबे यांनी केले आहे.

दरम्यान, याप्रकरणी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.

रेल्वे स्थानकाच्या पार्सल विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सीमाभिंतीलगत मोठ्या प्रमाणात टपऱ्या वाढल्या असून दिवसाढवळ्या नागरिक, प्रवासी लघुशंका करत आहेत. महिला प्रवाशांकडून याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने या परिसराची पाहणी केली. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क करून तातडीने कारवाई करण्याबाबत कळवले आहे.- इंदू दुबे, व्यवस्थापिका, पुणे रेल्वेे विभाग

Story img Loader