प्रादेशिक पारपत्र खात्यातर्फे ५ मे आणि १ जुलै या कालावधीत शिवाजीनगरमधील एसएसपीएमएस शाळेत पारपत्र महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून या मेळाव्यात रोज ६०० अर्जदारांना पारपत्रासाठी भेटीची वेळ मिळेल.
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि नगर या जिल्ह्य़ांतील नागरिकांना या मेळाव्यात पारपत्रासाठी अर्ज करता येणार आहे. शिवाजीनगरमधील श्री शिवाजी प्रीपरेटरी मिलिटरी स्कूलमध्ये (एसएसपीएमएस) हा मेळावा होणार आहे.
यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा असून अर्ज मंगळवार (३ मे) दुपारी १२ वाजल्यानंतर उपलब्ध होतील. पारपत्रासाठीचे शुल्क देखील ऑनलाइन भरायचे आहे. राखून ठेवलेले अर्ज किंवा तत्काळमधील अर्ज या मेळाव्यात विचारात घेण्यात येणार नाहीत, असेही विभागाकडून कळवण्यात आले आहे.
गेल्या वर्षी पारपत्र काढण्यासाठीचा महामेळावा औंधमध्ये घेण्यात आला होता. त्या मेळाव्यात तब्बल ३२ हजार नागरिकांनी पारपत्रे काढली.
महामेळाव्यात प्रथम एका दिवशी १०० पारपत्र अर्जदारांना भेटीच्या वेळा दिल्या जातील. हे प्रमाण हळूहळू वाढत दर दिवशी ६०० जणांना सेवा देण्यात येणार आहे.
पारपत्र मेळाव्याचे ५ मे ते १ जुलै कालावधीत आयोजन
यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा असून अर्ज मंगळवार (३ मे) दुपारी १२ वाजल्यानंतर उपलब्ध होतील.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 03-05-2016 at 01:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passport camp held between may 5 to july