ससून सर्वोपचार रुग्णालयात केवळ पुण्यातूनच नव्हे तर राज्यातील इतर भागातून रुग्ण गंभीर आजारांवरील उपचारासाठी येतात. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाचा विचार करता दररोज सरासरी तीन हजार रुग्ण येतात. पुणे महापालिका आणि जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये किरकोळ आजारांची सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध नसल्यामुळे हे चित्र दिसत आहे. यामुळे ससूनवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे.

हेही वाचा >>> पुणे मेट्रोला महावितरणचा ‘धक्का’! वीजपुरवठा खंडित झाल्याने सेवा ठप्प

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
99 crore RTE fee refund, RTE, refund ,
ठाणे : ९९ कोटी रुपयांचा आरटीई शुल्क परतावा थकीत !
Pimpri Municipal Corporation, transfers officers,
पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या प्रलंबित; बदली धाेरणाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ?
Pune Municipal Corporation takes action against seven private hospitals in Pune for violating rules Pune print news
पुण्यातील सात खासगी रुग्णालयांकडून नियमभंग! महापालिकेने उचलले कारवाईचे पाऊल 
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Employee Stress , App , Pune Municipal corporation ,
कर्मचाऱ्यांच्या ताणावर ॲपची मात्रा ! पुणे महापालिका प्रशासनाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

ससून रुग्णालय हे प्रामुख्याने गंभीर उपचारांसाठी आहे. रुग्णालयात किरकोळ आजारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रुग्णालयावरील ताण वाढत आहे. गंभीर आजारांच्या रुग्णांऐवजी किरकोळ आजारांच्या रुग्णांकडे लक्ष देण्याची वेळ रुग्णालयातील डॉक्टरांवर आली आहे. किरकोळ आजाराचे रुग्ण प्रामुख्याने पुणे शहर आणि जिल्ह्यातून येत आहेत. महापालिकेचे दवाखाने आणि जिल्ह्यातील सरकारी दवाखाने सक्षम नसल्याने ससूनमधील रुग्णसंख्या वाढत आहे. पर्यायाने ससून रुग्णालयावरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

हेही वाचा >>> ऑस्ट्रेलियात शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये १५ टक्के वाढ; भारत, चीन, नेपाळमधील सर्वाधिक विद्यार्थी

ससूनचे अधीक्षक डॉ. सुनील भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयाची क्षमता एक हजार २९६ खाटांची आहे. रुग्णालयात सध्या दाखल रुग्णांची संख्या एक हजार १८९ आहे. दररोज सरासरी १८६ रुग्ण दाखल होतात, तर १६७ जणांना रुग्णालयातून घरी सोडले जाते. रुग्णालयात दररोज ४३ मोठ्या आणि १०५ छोट्या शस्त्रक्रिया होतात. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सध्या १०२ रुग्ण आहेत. अतिदक्षता विभागात कायम १०० टक्के रुग्ण असतात. रुग्णालयात मागील वर्षभरात दररोज सरासरी १८ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात १२ ऑगस्टला २१ जणांचा मृत्यू झाला.

ससून हे गंभीर आजारांवरील उपचाराचे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव रुग्णालय आहे. हे सरकारी रुग्णालय असल्याने केवळ गंभीर आजारच नव्हे, तर किरकोळ आजाराचे रुग्ण आल्यानंतर त्यांच्यावरही उपचार केले जातात. त्यामुळे ताण काही प्रमाणात वाढत आहे. सध्या मनुष्यबळ पुरेसे असून, रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात आल्या आहेत.- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय

Story img Loader