‘महावितरण’च्या वतीने ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवींची स्वतंत्र बिले देण्यात आली आहेत. या बिलाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांना सध्या नोटिस पाठविण्यात आल्या आहेत. सुरक्षा ठेवींचा भरणा करणे अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने ‘आॉनलाइन’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘ऑनलाइन’ भरणा करण्यासाठी ‘महावितरण’च्या  www.mahadiscom.in या संकेतस्थळावर सुरक्षा ठेवींच्या थकबाकीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळावरील ‘मेक पेमेंट’ या रकान्यात ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ हा पर्याय घेतल्यास माहिती उपलब्ध होण्याबरोबरच रकमेचा भरणाही करता येणार आहे.
अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या भरण्यासाठी सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रातही व्यवस्था करण्यात आली आहे. वीजग्राहकांना देण्यात आलेल्या नोटिसांमध्ये ग्राहकाचे नाव, ग्राहक, उपविभाग व पीसी क्रमांकही देण्यात आला आहे. त्याआधारे कोणत्याही वीजबिल भरणा केंद्रामध्ये रकमेचा भरणा करता येणार आहे. सुरक्षा ठेव भरण्याची सुविधा एटीपी मशिनवर सध्या उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील वीजग्राहकांना वीजबिल भरणा केंद्रात रकमेचा भरणा करावा लागेल, असे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा