किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडचे व्यवस्थापन आणि राष्ट्रीय इंजिनिअरिंग श्रमिक संघ या कामगार संघटनेदरम्यान नुकताच वेतन करार झाला. एक एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१६ पर्यंतच्या तीन वर्षांच्या करारानुसार टीम मेंबर्सच्या वेतनामध्ये १० हजार ७५० रुपयांपर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वाढ करण्यात आली आहे. ३२२ टीममेंबर्सना या कराराचा लाभ मिळणार आहे. १९९५ ते २०१० पर्यंतच्या लागोपाठच्या सहा करारांप्रमाणेच आधीच्या कराराची मुदत संपण्यापूर्वीच हा सातवा करार करण्यात आला आहे. या त्रवार्षिक करारावर संघातर्फे सुशीलकुमार फ्रेड्रिक्स आणि पद्माकर ऊर्फ बुवा मांडके यांनी,तर व्यवस्थापनातर्फे व्यवस्थापकीय संचालक निहाल कुलकर्णी आणि कार्यकारी संचालक आर. आर. देशपांडे यांनी सह्य़ा केल्या. बेसिक, फिक्स्ड डीए आणि इतर भत्त्यांमध्ये वाढ, बोनस- एलटीए- लाँग सव्र्हिस मेरिट बेनिफीट – पेड हॉलिडेज – फेस्टिव्हल अॅडव्हान्समध्ये वाढ, कुटुंबीयांसाठी हॉस्पिटलायझेशन कव्हरेज आणि वार्षिक इन्क्रिमेंटमध्ये दुपटीने वाढ, ही या कराराची ठळक वैशिष्टय़े आहेत, असे वरिष्ठ महाव्यवस्थापक कृष्णा गावडे यांनी कळविले आहे.