पिंपरी: बंदी असतानाही प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर पिंपरी पालिकेच्या ‘ग्रीन मार्शल’ पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत अनेक किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. चिंचवड दवाबाजार येथील सात व्यावसायिकांना प्लास्टिक वापरल्याप्रकरणी ४० हजार रूपये दंड करण्यात आला.

पिंपरीत मुख्य बाजारपेठेत १५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. बाणेर येथील एका नामांकित रुग्णालयाने पिंपरी डेअरी फार्म रस्त्यावर वापरून झालेले रुग्णालयीन साहित्य टाकल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी संबंधितावर ३५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचपध्दतीने, चिंचवड येथील नामांकित रुग्णालयाला ३५ हजार रुपये दंड करण्यात आला.

Story img Loader