पिंपरी : आर्थिक वर्ष संपण्यास अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने महापालिकेच्या करसंकलन विभागाने थकबाकीदारांवर कडक कारवाई सुरू केली आहे. जप्तीपूर्व नोटीस बजावूनही कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या २०० थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत, तर १७ थकबाकीदारांचे नळजोड खंडित करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा सहा लाख १५ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. करसंकलन व करआकारणी विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपये उत्पन्नाचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत ६८० कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत जास्तीत जास्त करवसुली करण्यासाठी जप्ती मोहीम, नळजोड खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे.

Jewellery worth more than three lakh rupees seized from suspected vehicles in Bhiwandi
भिवंडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई, संशयित वाहनांतून तीन लाखाहून अधिक रुपयांचे दागिने जप्त
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
illegal constructions Navi Mumbai, Navi Mumbai,
नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांवर सहा वर्षे उलटूनही कारवाई नाही, उच्च न्यायालयाचा नियोजन यंत्रणांच्या नाकर्तेपणावर संताप
Mumbai police arrest four Lawrence Bishnoi gang members
लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित चौघे जण ताब्यात; मुंबई पोलिसांकडून कर्वेनगर भागात कारवाई
Action will be taken against drunken drivers by nakabandi in Pune city
शहरात आता रोज रात्री नाकाबंदी; मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश
Pune driving opposite direction, driving in the opposite direction,
पुणे : विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या बेशिस्तांवर कडक कारवाई
panvel traffic police
कळंबोली येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस सरसावले, पहिल्याच दिवशी रस्ता अडविणाऱ्या चालकांवर सहा फौजदारी गुन्हे दाखल
What caused the fall in industrial production index in the country
देशात औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील घसरण कशामुळे? ही मंदीची चाहूल मानावी का?

महापालिकेने एक एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत ३३ हजार २४१ मालमत्ताधारकांना जप्ती नोटिसा पाठविल्या. या मालमत्ताधारकांकडे ५८४ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यास पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली आहे. जप्तीचे नोटीस पथक घराच्या दारात पोहोचल्यानंतर सात हजार ८० जणांनी ७३ कोटी २८ लाखांचा कर भरला आहे, तर २०० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

फुगेवाडीतील सर्वाधिक ३८ मालमत्ता जप्त

आकुर्डी विभागात तीन, किवळे ३२, चऱ्होली चार, चिंचवड १४, चिखली १६, थेरगाव १८, दिघी एक, निगडी प्राधिकरण तीन, फुगेवाडीत ३८, भोसरी १६, महापालिका भवन विभागातील सहा, मोशी २९, वाकड सात आणि सांगवी विभागातील १३ अशा २०० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : मराठी नाट्य संमेलनाचा पिंपरी-चिंचवडकरांना फायदा; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिकेची ‘ही’ महत्त्वाची घोषणा

करसंकलन व करआकारणी विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले की, थकबाकीदारांना नोटीस देण्यात आल्या आहेत. नोटीस देऊनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. २०० मालमत्ता जप्त केल्या आहेत.