महानगर पालिका आयुक्तच असे बोलत असल्याने चर्चेला उधाण

पिंपरी- चिंचवड शहरातील कुदळवाडी भागात भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्यानंतर चिखली आणि कुदळवाडीतील अनाधिकृत गोदामांचा आणि भंगार दुकानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी अधिक बोलण्यास टाळाटाळ करत आधी आग विझवणे महत्त्वाच आहे. अनधिकृत गोदमांवर आपण नंतर बोलू अस म्हणत अनधिकृत गोदामांनाबद्दल न बोलता त्यांनी एक प्रकारे बगल दिली आहे. चिखली कुदळवाडी मध्ये आज सकाळी दहाच्या सुमारास गोदामाला भीषण आग लागली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या १५ ते २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमध्ये गोडाऊनला भीषण आग; धुरांचे लोट काही किलोमीटर..

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत. या आगे मध्ये आत्तापर्यंत ४० ते ५० दुकाने जळून खाक झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी दिली आहे. अद्याप घटनेत कुणीही जखमी नाही. जीविहितहानी झालेली नाही. दरम्यान, चिखली आणि कुदळवाडी परिसरात अनधिकृत गोदामे आणि भंगार दुकाने असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर सर्वात आधी आपण आग विझवणे यावर लक्ष केंद्रित करू मग अनाधिकृत गोदामांवर बोलू असं म्हणत त्यांनी गोदामांवर बोलणं टाळल आहे. हे पाहता महानगरपालिका अधिकारी आणि चिखली कुदळवाडीतील भंगार व्यावसायिक आणि अनधिकृत गोदाम यांच्यात संगनमत आहे. हे सर्वश्रुत झाल असल्याचं बोललं जातं आहे. आगीला जबाबदार असणाऱ्या वर कारवाई करणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी आश्वासन दिल आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc additional commissioner assured action against those responsible for fire at unauthorized scrap shops kjp 91 zws