काही वर्षांपूर्वी चिंचवडची ओळख असलेला क्रांतिवीर चापेकरांचा ६५ फुटी मनोरा रस्तारुंदीकरणात हटवल्यानंतर त्याच ठिकाणी चापेकर बंधूंचे शिल्पसमूह उभारण्याचा निर्णय झाला. महापालिकेने समारंभपूर्वक भूमिपूजन केले. थोडय़ाच कालावधीत त्या पुतळ्यांची उंची खूपच कमी असल्याचे निदर्शनास आल्याने नव्याने पुतळे उभारण्याची मागणी झाली. अनेक अडचणींना सामोरे गेल्यानंतर अखेर मुहूर्त मिळाला आणि मंगळवारी स्थायी समितीने मंगळवारी ५० लाखांच्या खर्चास मान्यता दिली.
चिंचवडगावात सहा रस्ते एकत्र येतात, त्या ठिकाणी महापालिकेने भव्य उड्डाणपूल उभारला आहे. तत्पूर्वी तेथील चापेकरांचा मनोरा हटवण्यात आला. या चौकात चापेकर बंधूंचे शिल्पसमूह उभारण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, २५ ऑगस्ट २०१० मध्ये तत्कालीन महापौर योगेश बहल यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. संथपणे सुरू असलेल्या या कामात त्या चौथऱ्याची व पुतळ्यांची उंची कमी असल्याचे लक्षात आले. भल्या मोठय़ा चौकात शिल्प झाकोळून जाणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. त्यात सुधारणा करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक संदीप चिंचवडे, अश्विनी चिंचवडे, गजानन चिंचवडे यांच्यासह माजी स्वातंत्र्यसैनिक संघटना व चापेकर स्मारक समितीने  महापालिकेकडे केली. त्यानुसार, महापालिकेने आधीच्या रचनेत बदल केला. आता दामोदरांचा पुतळा १२ फूट, वासुदेव व बाळकृष्ण यांचा प्रत्येकी साडेसात फूटाचा पुतळा राहणार असल्याचे सांगण्यात आले. नवनाथ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या कामासाठी ४७ लाख १० लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता देण्यात आली. याशिवाय, चौथऱ्यासाठी स्वतंत्रपणे ५० लाखाची तरतूद करण्यात आलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा