पिंपरी : बैठक सुरू असताना महापालिकेचे काही अधिकारी मोबाईल फोन पाहण्यात दंग झाल्याने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह चांगलेच संतापले. काय चालले आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त संदेश येतात का, लहान मुलांप्रमाणे वागत आहात, अशा शब्दांत आयुक्तांनी बैठकीत मोबाईल पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना खडसावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा २७ ऑगस्ट रोजी झाली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा >>> राज्यातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार, कोण आहेत मानकरी?

स्थायी समितीच्या बैठकीनंतर वातावरणीय बदलासंदर्भात खासगी संस्थेच्या प्रतिनिधीमार्फत सादरीकरण सुरू होते. हे सादरीकरण पाहण्यात रस नसलेले अधिकारी मोबाईल बघण्यात व्यस्त होते. त्यामुळे आयुक्त सिंह संतापले. काय चालले आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त संदेश येतात का, लहान मुलांप्रमाणे वागत आहात असे अधिकाऱ्यांना सुनावले. दरम्यान, आयुक्त सिंह यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, आयुक्तच बैठकीसाठी अर्धा तास उशिरा आले. त्यानंतर सुरुवातीला स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा झाली. वातावरणीय बदलासंदर्भात सादरीकरण झाले. सारथी हेल्पलाइन, क्षेत्रीय कार्यालयांचा आढावा, शिक्षण विभागाच्या थेट लाभ हस्तांतरणचा (डीबीटी) आढावा आदी विषयांवर सायंकाळी सात वाजेपर्यंत बैठक झाल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc chief shekhar singh got angry on some officials for watching mobile during meeting pune print news ggy 03 zws