पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी बुधवारी कुदळवाडी परिसरात साफसफाई करून तिसऱ्या दिवशीही साफसफाई मोहीम सुरु ठेवली. या मोहिमेअंतर्गत तीन ट्रक कचरा गोळा करण्यात आला. तसेच, मोकळ्या भूखंडांच्या स्वच्छतेसाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात येणाऱ्या जाधववाडी, कुदळवाडी येथे बुधवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी आयुक्त जाधव म्हणाले की, कोणत्याही महानगराचे मानांकन त्या शहराच्या स्वच्छतेवरून ठरवले जाते. त्यामुळे संपूर्ण िपपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करुन मानांकनात भर घालण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत २५४ मोकळे भूखंड आहेत. त्यांची महिन्यातून कमीत कमी दोन वेळा स्वच्छता करण्यासाठी कालमर्यादित कृती आराखडा तयार करा, असा सूचनाही त्यांनी दिल्या. या मोहिमेअंतर्गत बुधवारी परिसराची स्वच्छता करण्यात आली. काटेरी झुडपांची छाटणी करण्यात आली. प्लास्टिक, चपला, बॅगा, फुटलेल्या बाटल्या असा तीन ट्रक कचरा उचलण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा