पिंपरी पालिका पदाधिकाऱ्यांची मागणी
दिवसातून एक वेळ कचरा उचलण्याची पध्दत आता कालबाह्य़ ठरत असल्याचे सांगत दिवसातून दोन वेळा साफसफाई तसेच कचरा उचलण्यात यावा, अशी आग्रही मागणी पिंपरी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार, व्यापारी परिसरात दोन वेळा सफाई तसेच स्वच्छता करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
शहरातील स्वच्छतेविषयी पालिका पदाधिकारी व आरोग्य विभागाची संयुक्त बैठक झाली, तेव्हा ही मागणी करण्यात आली. महापौर नितीन काळजे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सहआयुक्त दिलीप गावडे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार, विधी समितीच्या सभापती शारदा सोनवणे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता तापकीर, गटनेते कैलास बारणे आदी उपस्थित होते. बैठकीत पदाधिकारी व नगरसेवकांनी स्वच्छतेच्या कामात हयगय होत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
पक्षनेते पवार म्हणाले, महापालिका परिसर व रस्त्यांची स्वच्छता तातडीने करण्यात यावी. दिवसातून दोन वेळा कचरा उचलण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. यासाठी आवश्यकता भासल्यास वाहनांची व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी. परिसर स्वच्छ राखण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत. सीमा सावळे म्हणाल्या, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक प्रयत्न व्हावेत. पदाधिकारी व नगरसेवकांच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर आयुक्तांनी या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. आरोग्य निरीक्षकांनी तीन दिवसात त्यांच्या परिसरातील स्वच्छतेची व्यवस्था करावी. अन्यथा, अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. दुरुस्तीअभावी कार्यशाळेत एकही वाहन राहता कामा नये, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी.
वर्दळीचे चौक व ठिकाणे निश्चित करावीत आणि त्या ठिकाणी स्वच्छता राखण्याचे नियोजन करावे, असेही आयुक्तांनी बजावले.