पिंपरी : महापालिकेच्या शहरातील सुसज्ज रुग्णालयांतील पायाभूत आणि आरोग्य सुविधा सक्षम आहेत. या सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, त्यातील अडचणी दूर करण्यासाठी आरोग्य कृती आराखडा तयार केल्या जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेने राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राने प्रदान केलेल्या रचनेनुसार आरोग्य कृती योजना आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्याअंतर्गत महापालिका आणि युनिसेफ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यशाळा पार पडली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, डॉ. अभयचंद्र दादेवार, डॉ. शिवाजी ढगे, डॉ. श्रीकांत सुपेकर, डॉ. अभिजित सांगडे उपस्थित होते.

हेही वाचा >>> पिंपरी : निगडीपर्यंत मेट्रो कधीपर्यंत धावणार? ‘इतक्या’ कोटींची निविदा प्रसिद्ध

महापालिकेच्या वतीने शहरात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे. महापालिकेस विविध पुरस्कारही मिळाले आहेत. नवी दिशा, झोपडपट्टी शून्य कचरा व्यवस्थापन यांसारखे महत्त्वाकांक्षी उपक्रम महापालिका राबवीत आहे. नागरिकांचाही या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग आणि शहर पातळीवरील आरोग्य कृती आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी प्रभागनिहाय विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी युनिसेफ संस्थेशी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी दिल्या. आशासेविकांचे प्रशिक्षण, त्यांना येणारी आव्हाने, अडचणी, गर्भधारणेच्या अत्याधुनिक सुविधा, लहान मुलांचे आरोग्य, स्वच्छतेची गुणवत्तावाढ, मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc make action plan for better health facilities for citizen living in pimpri chinchwad pune print news ggy 03 zws