पिंपरी पालिकेत सलग दोनदा निर्विवाद बहुमत मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांना सत्तेची पदे मिळालीच नाहीत. त्यामुळे किमान प्रभागाचे स्वीकृत सदस्यपद तरी मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे. वास्तविक, तीन वर्षांपूर्वीच जाहीर करावयाच्या या नियुक्तया आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर होत असल्याने कोणाला संधी द्यायची, यावरून नेत्यांमध्येही संभ्रमावस्था आहे.
पिंपरी पालिकेतील अ, ब, क, ड, ई आणि फ या सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे १८ कार्यकर्त्यांची निवड शुक्रवारी (२१ ऑगस्ट) होणार आहे. त्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून निवड प्रक्रिया होईल. स्वीकृतसाठी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांच्या अर्जाचा पाऊस पडला होता. त्यातील २१३ कार्यकर्त्यांचेच अर्ज वैध ठरले आणि त्यातून १८ कार्यकर्त्यांची निवड होणार आहे. निर्णयाचे पूर्ण अधिकार ‘कारभारी’ अजित पवार यांच्याकडे आहेत. पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्या तसेच पक्षकार्यालयात राबणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्या, अशी विनंती स्थानिक नेत्यांनी त्यांच्याकडे केली आहे. काही तासच राहिले असल्याने आपले नाव वेगवेगळ्या मार्गाने अजितदादांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करत आहेत. अजितदादा असतील तिथे इच्छुक प्रकट होत असल्याने तेही वैतागले आहेत. सोमवारी  सांगवीत एका कार्यक्रमासाठी अजित पवार आले, तेव्हा कार्यकर्त्यांची झुंबड उसळली. ते पाहून ही गर्दी स्वीकृतच्या इच्छुकांची असल्याची टपिं्पणी त्यांनीच केली होती. आगामी निवडणुकांची गणिते डोळ्यासमोर ठेवून नावे ठरणार असून कोणाची वर्णी लागते, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा