पिंपरी :  नेपाळसह भारतातील विविध राज्यातून आलेल्या दिडशे कलाकारांनी सांकेतिक भाषेसह तब्बल १६ भाषांमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे गायन करून इतिहास घडवला आहे. अशा प्रकारे सांगितिक कार्यक्रमातून भारतीय संविधानाला महामानवंदना देणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. 

भारतीय राज्यघटनेला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीबद्दल भारतीय राज्यघटनेला सांगितिक महामानवंदना देण्यासाठी प्रजासत्ताक दिनी महापालिकेने ‘आम्ही भारताचे लोक’ (हम भारत के लोग) हा दिडशे कलावंतांचा सहभाग असलेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता.  पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मैदानात हजारोंच्या उपस्थितीत विभिन्न भाषेतून भारतीय राज्यघटनेला महामानवंदना देण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्याची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. याबाबतची घोषणा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’च्या कार्यकारी अधिकारी प्रिती मेनन यांनी केली.

The application deadline for 25 percent reserved seats in private schools under rte has been extended
‘आरटीई’अंतर्गत प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ, आतापर्यंत किती अर्ज दाखल?
Larsen & Toubro (L&T) loses a significant Rs 70,000 crore submarine deal after CEO's controversial 90-hour workweek statement.
L&T ला धक्का, सरकारने रद्द केली ७० हजार…
Shocking video two man fight in running local dore in Virar local video viral on social media
VIDEO: “एक चूक अन् खेळ खल्लास” विरार लोकलच्या दरवाजात दोन पुरुषांमध्ये भयंकर हाणामारी; मान धरली अन् थेट…
horn
हे फक्त पुणेकरच करू शकतो! दुचाकी चालवताना चालकाने तर कहर केला, हॉर्न ऐवजी….,Viral Video बघाच
Mamta Kulkarni net worth
५२ व्या वर्षी संन्यास घेणाऱ्या मराठमोळ्या ममता कुलकर्णीची संपत्ती किती? वाचा…
dombivli municipal corporation loksatta news
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात पालिकेच्या स्वच्छता दुतांच्या उपद्रवाने नागरिक हैराण
national flag disrespected marathi news
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी वडापाव विक्रेत्याविरुद्ध गुन्हा
flower festival held at byculla zoo
राणीच्या बागेतील पुष्पोत्सवात राष्ट्रीय प्रतीकांचा जागर; यंदा महापालिका वाघ, डॉल्फिन, कमळ, अशोकस्तंभ,

‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या विविधतेतून एकतेचा संदेश देणाऱ्या बहुभाषिक गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारत हमको जान से प्यारा है, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, ये मेरा संविधान, अशा विविध गीतांचे गायन विविध राज्यातील बहुभाषिक कलाकारांनी केले. यानंतर भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या गायनाला प्रारंभ करण्यात आला. यामध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, पाली, कोकणी, आसामी, कन्नड, पंजाबी, गुजराती, नेपाळी, मल्याळम, भोजपुरी, बंगाली अशा १५ भाषांमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे गायन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिका दिव्यांग भवनच्या फाऊंडेशनच्या वतीने सांकेतिक भाषेमध्येही राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सादरीकरण करीत भारतीय राज्यघटनेला महामानवंदना दिली. प्रांतिक पोषाख परिधान करून केलेल्या या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. अशा प्रकारे सांकेतिक भाषेसह तब्बल १६ भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गायन झालेला हा पहिला कार्यक्रम असल्याने त्याची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. महापालिकेने राबवलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेला अनोखी महामानवंदना देण्यात आली.

लोकप्रिय गायकांचा सहभाग

अश्वघोष कला आणि संस्कृती प्रतिष्ठान कोल्हापूरचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमामध्ये लोकप्रिय पंजाबी गायिका गिन्नी माही, अंजली बौद्ध, लोकप्रिय गुजराती गायक विशान काथड, भोजपुरी गायक ओंकार प्रिन्स, मल्याळम गायक सिद्धेश, कन्नड गायक नारायणस्वामी यांच्यासह  प्रशांत शिराळे (हिंदी), विजय बनगे (मराठी), ⁠सनी समुद्रे (इंग्रजी), ⁠शफिक मुल्ला (उर्दु), ⁠ममता ठाकूर देसाई (संस्कृत), मार्गेश पाटील (नेपाळी), ⁠पंडित राठोड (कोकणी), सुजीत म्हेत्री (कन्नड), सिद्धराज पाटील (गुजराती) ⁠डॉ. महेंद्र कानडे (पंजाबी), ⁠रणजित शिवशरण (पाली) अशा दिग्गज गायकांसह सुमारे १५० कलाकारांनी सहभाग घेत भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे गायन केले. प्रजासत्ताक दिनी महापालिकेच्या वतीने सांकेतिक भाषेसह १६ विविध भाषांमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे गायन करीत आपल्या राज्यघटनेला विश्वविक्रमी महामानवंदना दिली. या अनोख्या अलौकिक उपक्रमाची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासियांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. भारताचे गौरवगान करणाऱ्या या विश्वविक्रमाने शहराच्या वैभवात भर पडली असून पिंपरी-चिंचवडचे नाव जागतिक पातळीवर गौरविले जात असल्याचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.

Story img Loader