पिंपरी : नेपाळसह भारतातील विविध राज्यातून आलेल्या दिडशे कलाकारांनी सांकेतिक भाषेसह तब्बल १६ भाषांमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे गायन करून इतिहास घडवला आहे. अशा प्रकारे सांगितिक कार्यक्रमातून भारतीय संविधानाला महामानवंदना देणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतीय राज्यघटनेला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीबद्दल भारतीय राज्यघटनेला सांगितिक महामानवंदना देण्यासाठी प्रजासत्ताक दिनी महापालिकेने ‘आम्ही भारताचे लोक’ (हम भारत के लोग) हा दिडशे कलावंतांचा सहभाग असलेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मैदानात हजारोंच्या उपस्थितीत विभिन्न भाषेतून भारतीय राज्यघटनेला महामानवंदना देण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्याची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. याबाबतची घोषणा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’च्या कार्यकारी अधिकारी प्रिती मेनन यांनी केली.
‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या विविधतेतून एकतेचा संदेश देणाऱ्या बहुभाषिक गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारत हमको जान से प्यारा है, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, ये मेरा संविधान, अशा विविध गीतांचे गायन विविध राज्यातील बहुभाषिक कलाकारांनी केले. यानंतर भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या गायनाला प्रारंभ करण्यात आला. यामध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, पाली, कोकणी, आसामी, कन्नड, पंजाबी, गुजराती, नेपाळी, मल्याळम, भोजपुरी, बंगाली अशा १५ भाषांमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे गायन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिका दिव्यांग भवनच्या फाऊंडेशनच्या वतीने सांकेतिक भाषेमध्येही राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सादरीकरण करीत भारतीय राज्यघटनेला महामानवंदना दिली. प्रांतिक पोषाख परिधान करून केलेल्या या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. अशा प्रकारे सांकेतिक भाषेसह तब्बल १६ भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गायन झालेला हा पहिला कार्यक्रम असल्याने त्याची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. महापालिकेने राबवलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेला अनोखी महामानवंदना देण्यात आली.
लोकप्रिय गायकांचा सहभाग
अश्वघोष कला आणि संस्कृती प्रतिष्ठान कोल्हापूरचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमामध्ये लोकप्रिय पंजाबी गायिका गिन्नी माही, अंजली बौद्ध, लोकप्रिय गुजराती गायक विशान काथड, भोजपुरी गायक ओंकार प्रिन्स, मल्याळम गायक सिद्धेश, कन्नड गायक नारायणस्वामी यांच्यासह प्रशांत शिराळे (हिंदी), विजय बनगे (मराठी), सनी समुद्रे (इंग्रजी), शफिक मुल्ला (उर्दु), ममता ठाकूर देसाई (संस्कृत), मार्गेश पाटील (नेपाळी), पंडित राठोड (कोकणी), सुजीत म्हेत्री (कन्नड), सिद्धराज पाटील (गुजराती) डॉ. महेंद्र कानडे (पंजाबी), रणजित शिवशरण (पाली) अशा दिग्गज गायकांसह सुमारे १५० कलाकारांनी सहभाग घेत भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे गायन केले. प्रजासत्ताक दिनी महापालिकेच्या वतीने सांकेतिक भाषेसह १६ विविध भाषांमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे गायन करीत आपल्या राज्यघटनेला विश्वविक्रमी महामानवंदना दिली. या अनोख्या अलौकिक उपक्रमाची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासियांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. भारताचे गौरवगान करणाऱ्या या विश्वविक्रमाने शहराच्या वैभवात भर पडली असून पिंपरी-चिंचवडचे नाव जागतिक पातळीवर गौरविले जात असल्याचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.