पिंपरीतील दिवंगत महापौर भिकू वाघेरे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांना जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ खासदार शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी (६ जून) चिंचवडला पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अकरा हजार रुपये रोख व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रामकृष्ण मोरे नाटय़गृहात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने अण्णा कापसे, चिंधाजी गोलांडे, रमेश गोलांडे यांनाही गौरवण्यात येणार असून
सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc samajbhushan award to dr sadanand more