पिंपरी : झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या वतीने योजक स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने मोशीतील संजय गांधीनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उभारण्यात आली आहे. या धर्तीवर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अभ्यासिका सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पिंपरी : पवना धरण काठोकाठ भरुनही पाणीपुरवठा दिवसाआडच; काय आहे नेमके कारण?

अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त अण्णा बोदडे, योजक संस्थेच्या रेणू इनामदार या वेळी उपस्थित होत्या. अभ्यासिकेचा प्रकल्प वाखाणण्याजोगा आहे. या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तके, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मोफत शैक्षणिक, करियर मार्गदर्शन अशा सुविधा देण्यात येणार आहेत. हा उपक्रम सर्वांसाठी आदर्श ठरणार आहे. या उपक्रमाचा अवलंब शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत केला जाणार असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी. त्यासाठी अभ्यासिका सुरू केल्या जाणार आहेत. पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि करियरविषयक मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc set up library in slums with collaboration of ngo pune print news ggy 03 zws