शहरातील गजबजलेल्या, दाट लोकवस्ती असलेल्या भागात शौचालय सापडणे तसे दिव्यच. पुरुषांना कशीही वेळ मारून नेता येते. मात्र सर्वाधिक कुचंबणा महिलांची होते. अशा परिस्थितीत, जवळच्या परिसरात कुठे स्वच्छतागृहे व शौचालये आहेत, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असेल तर त्यासारखी सुखद धक्का देणारी दुसरी गोष्ट नसेल. पिंपरी महापालिकेने हे काम हाती घेतले आहे. त्यासाठी सव्रेक्षण करण्यात येणार असून शहरातील सुमारे अडीच ते तीन हजार स्वच्छतागृह व शौचालयांची एकत्रित माहितीदेणारे ‘टॉयलेट लोकेटर’ हे अ‍ॅप विकसित करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील वेगवेगळय़ा शहरांमध्ये सार्वजनिक व सामुदायिक शौचालये दर्शवणारे ‘टॉयलेट लोकेटर’ अ‍ॅप विकसित करून ते उपयोगात आणण्यात येत आहे. नागरिकांची कुचंबणा दूर करणे आणि त्यांना महत्त्वपूर्ण अशी आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे हा त्यामागे हेतू आहे.

Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
software exports maharashtra
‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
Advay Hire , Malegaon Bazar Committee Chairman,
मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे अपात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
Mumbai zopu yojana loksatta news
घर मिळालेल्या झोपडीवासीयांच्या नावे पुन्हा पात्रता! घोटाळा उघड होऊन वर्षभरानंतरही कारवाई नाही

पेट्रोल पंप, मॉल, दवाखाने, रेल्वे स्थानके, बसस्थानके आदी ठिकाणी असणाऱ्या शौचालयांची व स्वच्छतागृहांची एकत्रित माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात येते. आतापर्यंत देशातील दिल्ली, गुरगाव, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, इंदूर, भोपाळ या शहरांमध्ये हा प्रयोग राबवण्यात आल्याचा व त्यातील पाच शहरांमध्ये यशस्वी झाल्याचा दावा करत पिंपरी पालिकेनेही त्याचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने आवश्यक पावले उचलण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छतागृहे व शौचालयांची संख्या अडीच ते तीन हजारांपर्यंत असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. ही माहिती ‘गुगल मॅप’वर टाकण्यात येणार आहे. तत्पूर्वी, महापालिकेच्या वतीने रीतसर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेला (क्यूसीआय) हे सर्वेक्षणाचे काम देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी दोन लाख रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. प्रत्यक्ष खर्चाचा हा बोजा महापालिकेवर पडणार नसून तो केंद्र सरकार करणार आहे. हा खर्च अनुदान स्वरूपात केंद्र व राज्य सरकारकडे मागणी करून मनपा फंडात जमा करता येणार असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे अ‍ॅप उपलब्ध झाल्यास नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

अशा प्रकारचे अ‍ॅप विकसित करणारी पिंपरी-चिंचवड ही राज्यातील पहिलीच महापालिका आहे. या माध्यमातून नागरिकांची विशेषत: महिलांची सोय होणार आहे. या संदर्भात शहरभरात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या बाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

दिलीप गावडे, सहआयुक्त, पिंपरी पालिका

Story img Loader