पिंपरी : आंद्रा धरणातून सोडलेले ५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी प्रतिदिन इंद्रायणी नदीतून घेण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरुवात केली आहे. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून शहरातील समाविष्ट भागाला पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे मागील साडेतीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जाणाऱ्या शहरवासीयांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.

शहराची लोकसंख्या वाढत असताना पाण्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. मावळातील पवना धरणातून ५१० तर एमआयडीसीकडून ३० असे ५४० एमएलडी पाणी वितरित केले जात होते. मात्र, शहराच्या विविध भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सुरू होत्या. शहरासाठी मावळ तालुक्यातील आंद्रातून शंभर, तर खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून १६७ असा २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी कोटा मंजूर आहे. या पाण्यावरील प्रक्रियेसाठी चिखलीत ३०० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण होऊन चार ते पाच महिने झाले होते. मात्र, मंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन रखडले होते. त्यामुळे पाणी सुरू करण्यात आले नव्हते. अखेर महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर ५० एमएलडी अशुद्ध जलउपसा करण्यास सुरुवात केली. इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून पंपाद्वारे पाणी उचलून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जात आहे. तेथे प्रक्रिया झाल्यानंतर जलवाहिन्यांद्वारे पाणी शहराला वितरित केले जात आहे.

The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Water supply to Kalyan Dombivli cities to be cut off for 18 hours on Thursday
कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
Will water supply in Wardha remain shut indefinitely
वर्ध्यात पाण्यासाठी हाहा:कार! पाणीपुरवठा बेमुदत बंद राहणार ?
Vasai Virar Municipal corporaton , Water Supply Vasai Virar, Water Team Vasai Virar ,
वसई : पालिकेचे पाणी पथक स्थापन, आमदारांनी खडसावताच पालिका सक्रिय

हेही वाचा >>> चिंचवडमध्ये भेसळयुक्त ५४६ किलो पनीर जप्त ; कारखान्यावर छापा

चिखली जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी, बोपखेल या गावांसह भोसरीचा काही भाग आणि प्राधिकरण सेक्टर एक ते १६ भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत या भागात पुरविले जाणारे पाणी शहराच्या अन्य भागात वितरित केले जाणार आहे.

भामा-आसखेडच्या पाण्यासाठी तीन वर्षांची प्रतीक्षा

भामा-आसखेड धरणातून मंजूर १६७ दशलक्ष लिटर पाणी येण्यास आणखी किमान अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाणार आहे. मात्र, धरणग्रस्त शेतकरी आणि जलवाहिनी टाकली जाणाऱ्या इंदोरी परिसरातील शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्यासह अन्य मागण्या मान्य केल्याशिवाय काम होऊ न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे काम संथ गतीने सुरू आहे.

आंद्रा धरणातून मिळालेले पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून उचलले जात आहे. सध्या प्रतिदिन ५० दशलक्ष लिटर अशुद्ध जलउपसा करून प्रायोगिक तत्त्वावर पाणी वितरण सुरू केले. टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली जाणार आहे. जुन्या व नवीन जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. – श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, पाणी पुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

Story img Loader