पिंपरी : नागरिकांचा वाढत विरोध होऊनही खर्चापेक्षा उत्पन्न कमी असल्याचे कारण देत नाट्यगृहांच्या भाडेवाढीवर ठाम राहिलेले महापालिका प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मागे आले. भाडेवाढीचा निर्णय मागे घेत १० जानेवारी २०२३ पूर्वीच्या जुन्या दराप्रमाणे भाडे मूल्य आकारणी केली जाणार आहे. यामुळे सांस्कृतिक क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह आणि निगडी, प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर अशी पाच नाट्यगृहे महापालिकेने उभारली आहेत. खासगी सभागृहांपेक्षा नाट्यगृहाचे दर कमी होते. परंतु, खर्चापेक्षा उत्पन्न कमी, अनेक वर्षांपासून भाडेवाढ केली नसल्याचे कारण देत प्रशासकांनी नाट्यगृहांच्या भाड्यात १ जुलैपासून दुपट्टीने वाढ केली. लोकप्रतिनिधीनींही भाडेवाढीस विरोध केला. त्यानंतर प्रशासनाने १ ऑगस्ट २०२३ रोजी ५० टक्क्यांनी भाडेवाढ कमी केली होती. या भाडेवाढीलाही कलाकारांचा तीव्र विरोध होता.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी भाडेवाढीचा मुद्दा उपस्थित केला. भाडेवाढ कमी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. यास प्रतिसाद देत मुख्यमंत्री शिंदे यांनी भाडे आकारणी कमी करण्याचे निर्देश महापालिकेला दिले. त्यानुसार पूर्वी प्रमाणे नाट्य संस्थाना भाडे शुल्क आकारण्याबाबतचा आदेश प्रसूत करण्यात आला. व्यावसायिक, हौशी नाटक, शाळा, महाविद्यालयाच्या कार्यक्रमांना पूर्वीप्रमाणे भाडे आकारले जाणार आहे.

नाट्यगृहाचे नवीन दर

अंकुशराव लांडगे नाट्यगृहात संगीत तालमीसाठी दोन तासाकरिता ७८७, बाल नाट्यासाठी ११८०, तीन तासांच्या नाटकासाठी ३४२४, इतर कार्यक्रमासाठी ६६८६ रुपये, पाच तासासाठी १३ हजार ३७१, आठ तासासाठी १९ हजार ९४४, दहा तास २६ हजार ६२९, १२ तास ३३ हजार २०२ आणि १५ तासासाठी ३९ हजार ७७६ दर असतील. अत्रे रंगमंदिरातील दोन तासांच्या रंगीत तालमीसाठी ५३३, बालनाट्य ७६८, तीन तासाठी १८३०, ऑर्केस्ट्रासाठी ३७७६, पाच तास ७४९४, सात तास ११ हजार २१०, दहा तास १४ हजार ९२८, १२ तास १८ हजार ६४४, १५ तासासाठी २२ हजार ३६२ असे दर असतील.

निळु फुले रंगमंदिरात तालमीच्या दोन तासाठी १२९८, बालनाट्य १९४७, तीन तासाच्या नाटकासाठी ५४८७, इतर कार्यक्रमासाठी १० हजार ५६१, पाच तासासाठी २१ हजार १८१, आठ तास ३३ हजार ४५३, दहा तास ४२ हजार १८५, १२ तास ५० हजार ६८१ आणि १५ तासासाठी ६२ हजार ८३५ रुपये भाडे होते. तर, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील दोन तासाठी ५३१, बालनाट्य ९४४, मराठी, सुगम शास्त्रीय संगिताच्या तीन तासांसाठी २५३७, ऑर्केस्ट्रॉसाठी ४८३८, पाच तासांसाठी ९५५८, आठ तास १४ हजार २७८, दहा तास १८ हजार ११८, १२ तास २३ हजार ७१८, १५ तासांसाठी २४ हजार ४३८ रुपये भाडे असणार आहे.

नाट्यगृहाचे जुने दर

आचार्य अत्रे रंगमंदिर, अंकुशराव लांडगे नाट्यगृह, नटसम्राट निळू फुले नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणेसह मोफत असलेली मराठी नाटके, ऑर्केस्ट्रॉच्या तीन तासांसाठी पाच हजार ४००, तिकीटांच्या कार्यक्रमांसाठी सात हजार २००, शाळांना तीन तासाकरिता ११ हजार २५०, तिकीट असल्यास १३ हजार ५०० रुपये, महाविद्यालयांना पाच तासासाठी १८ हजार, तिकीट असल्यास २१ हजार ६००, इतर संस्थांसाठी १३ हजार ५००, तिकीट असल्यास १४ हजार ८५० रुपये भाडे आकारले जाणार होते. तर, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि गदिमा नाट्यगृहासाठी मोफत असलेली मराठी नाटके, ऑर्केस्ट्रॉच्या तीन तासांसाठी सहा हजार, तिकीट असलेल्या कार्यक्रमांसाठी आठ हजार, शाळांच्या तीन तासाकरिता १२ हजार ५००, तिकीट असल्यास १५ हजार, महाविद्यालयांसाठी पाच तासाकरिता २० हजार, तिकीट असल्यास २४ हजार आणि इतर संस्थांसाठी १५ हजार, तिकीट असल्यास १६ हजार ५०० रुपये दर असणार होते.