पुणे : पादचारी दिनाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेने गेल्या आठवड्यात लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन साजरा केला. पादचारी हा राजा असल्याने त्यांना सुरक्षितपणे रस्त्यावरून चालता यावे, यासाठी पादचारी दिनानिमित्त महापालिकेने ११ डिसेंबरला विविध कार्यक्रम घेतले. या दिवशी लक्ष्मी रस्ता १२ तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा उपक्रम राबविला गेल्याचा दावा महापालिकेच्या वतीने केला जात असला तरी लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने या रस्त्याला समांतर असलेल्या केळकर, कुमठेकर, बाजीराव रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. महापालिकेला रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांची किती काळजी आहे, हे दाखविण्यासाठी हा दिन साजरा करण्यात आला.

एक दिवस शहरातील रस्ता वाहतुकीला बंद ठेवत एका दिवसाच्या उपक्रमासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च केले. एक दिवस पादचारी दिन साजरा केला म्हणजे आपली जबाबदारी संपली, असाच काही समज महापालिका प्रशासनाने करून घेतल्याचे दिसून आले. पादचारी दिनाचा एका दिवसाचा सोहळा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ‘ये रे माझ्या मागल्या’ असेच चित्र लक्ष्मी रस्त्यावर पाहायला मिळाले. पादचारी दिनाला चालण्यासाठी मोकळे ठेवलेले लक्ष्मी रस्त्यांवरील पदपथ दुसऱ्या दिवसापासून पुन्हा पथारी व्यावसायिकांनी भरून गेेले. ही अशीच स्थिती शहरातील बहुतांश पदपथांवर दररोजची असताना मग केवळ एका दिवसासाठी लाखो रुपयांचा खर्च करून पादचारी दिन साजरा करण्याचा महापालिका प्रशासनाचा हट्ट का? असा प्रश्नही यानिमित्त उपस्थित केला जात आहे.

Eknath Shinde
Maharashtra LIVE Updates : उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी हास्यास्पद, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “जेलमध्ये टाकू अशी…”
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
pm narendra modi on amit shah dr babasaheb ambedkar congress
अमित शाहांवरील टीकेला पंतप्रधान मोदींनी दिलं प्रत्युत्तर; डॉ. आंबेडकरांविषयीच्या विधानावरून विरोधकांवर हल्लाबोल!
Murder of missing student in yavatmal is solved man arrested
अपमानाचा वचपा हत्या करून काढला, बेपत्ता विद्यार्थिनीच्या हत्येचा उलगडा
Sanjay Shirsat on Sharad Pawar
Sharad Pawar : “जेव्हा ते शांत असतात तेव्हा समजून जायचं की…”; शरद पवारांबद्दल शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar : बाबासाहेबांचा दोनदा निवडणुकीत पराभव होण्यावर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
school transport Pune, school Pune, vehicles pune,
पुण्यातील शालेय वाहतुकीच्या प्रश्नावरून नागपुरात आवाज! आता तरी वाहनांची तपासणी होणार ?
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!

हेही वाचा – पुण्यातील शालेय वाहतुकीच्या प्रश्नावरून नागपुरात आवाज! आता तरी वाहनांची तपासणी होणार ?

पादचाऱ्यांच्या अपघातांंचे काय?

रस्त्यावरून चालणाऱ्या पादचारी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, त्याचे महत्त्व समजावे या उद्देशाने पुणे महापालिका पादचारी दिन साजरा करते. एक दिवसीय समाज प्रबोधन कार्यक्रमासाठी सुमारे ४७ लाखांचा खर्च करण्यात आला. मात्र यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांचे अपघात व जीवितहानीचे प्रमाण कमी होणार आहे का? उलट एक दिवसाच्या पादचारी दिनामुळे शहरातील वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली. वाहन चालकांना, पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. लक्ष्मी रस्ता बंद केल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीचा कोणताही अभ्यास न करता महापालिकेने हा प्रयोग केला, असा आरोप केला जात आहे. एक दिवसासाठी स्टंटबाजी करून पादचारी दिन साजरा करायचा, नागरिकांच्या कष्टाचा व घामाचा कररूपी गोळा केलेला पैसा हा अशा प्रकारे वाया घालविणे योग्य नाही. केवळ एक दिवस हा दिन साजरा करून शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंग, रस्ते, वाहनतळ रस्त्यांची दुरवस्था, पदपथावरील अतिक्रमणे, अपघात, जीवितहानी यांसारखे गहन समस्या बनलेले प्रश्न सुटणार आहेत का?
आजही लक्ष्मी रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. असे असताना लाखो रुपयांची उधळपट्टी करून प्रशासन पुणेकरांची दिशाभूल करत आहे. यापेक्षा प्रशासनाने चांगले रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंग, वाहन तळांवर होणारी लूट, पदपथावरील अतिक्रमणे, अपघात, जीवितहानी या समस्या सोडवून वाहनचालक, पादचारी यांना जीवनदान देण्यासाठी भरीव कार्य करावे. सर्वसामान्य नागरिक, पादचारी, वाहनचालक यांचा विश्वास संपादन करावा. एक दिवसाचा पादचारी दिन साजरा करून शहराला इतर गहन समस्यांमध्ये अडकवू नये, असे अनिल अगावणे म्हणाले.

मध्यवर्ती भागाऐवजी उपनगरांमध्ये प्रयोग करावेत

महापालिकेच्या एक दिवसाच्या पादचारी दिनाने लक्ष्मी रस्त्यावरील पादचारी कदाचित सुखावले असतील. पण बाजीराव रस्ता व इतर समांतर व संलग्न रस्त्यांवरील वाहतूक कोंडीत ताटकळून अनेक वाहनचालक दुखावले गेले. या गल्लीबोळांसारख्या रस्त्यांवरून चालत जाणारे पादचारीही हतबल झाले. महापालिकेने लक्ष्मी रस्त्यावर ‘पादचारी दिन’ साजरा करण्यापेक्षा, कोथरूडमधील प्रतीक नगर, पिंपळे सौदागर, औंध अशांसारख्या उपनगरांमधील मोठ्या रस्त्यांवर, ज्यांच्या काही भागांत पादचाऱ्यांनी मनसोक्त बागडावे आणि वाहनांनीही आपली मार्गिका सांभाळत सुखाने जावे. महापालिकेने हा प्रयोग केवळ पादचारी दिनानिमित्त न करता वर्षभरात केव्हाही करावा. मध्यवर्ती भागातील नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, अशी भावना प्रशासनाची असेल तर मध्यवस्तीतील नागरिकांना मुलाबाळांसह अशा ठिकाणी जाण्यासाठी आणि मनसोक्त मौज करून घरी परत येण्यासाठी पीएमपीची सेवा उपलब्ध करून देता येईल का? याकडे लक्ष द्यावे. यामुळे नागरिकांची किफायतशीर सहल आणि पीएमपीला महसूल, अशा दोन्हीचा मेळ बसू शकेल, ही पेक्षा श्रीपाद कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – सवाई गंधर्व महोत्सवासाठी पीएमपीची विशेष बससेवा, कोणत्या मार्गांवरून कधी धावणार बस ?

तुम्हीही मांडा गाऱ्हाणे

तुमच्या भागात, क्षेत्रीय कार्यालयातील नागरी समस्या, तुम्हाला होणारा त्रास तुम्ही या सदरासाठी पाठवू शकता. त्यासाठी ई-मेल आयडी : lokpune4 @gmail.com

Story img Loader